सध्याच्या काळातील एक महत्वाचा मुद्दा आहे स्थलांतरितांचा,अगदी बांगलादेशातून भारतात येणारे असोत किंवा यु.एस.ए.मधील मेक्सिकोतले असोत.मुंबईत येणारे परप्रांतीय आणि त्यावरुन केले जाणारे राजकारण सर्वश्रुतच आहे.पण कोणीतरी स्वतःची भूमी, मुळची माती,हक्काची जमीन सोडून दुसऱ्या देशात आनंदाने तर येत नाही ना.अशा बाहेरुन आलेल्या जनसमुदायाबरोबर संस्कृतीचा,परंपरेचा,रुढींचा आणि जनजीवनाचा एक हिस्साही येतो.महाराष्ट्रातील विदर्भातील चंद्रपूरमध्ये बांगला देश निर्मितीच्या वेळी एक मोठा बंगाली जनसमुदाय येऊन स्थिरावला,चंद्रपूरमधील या छोट्या बंगालची हीओळख माधवी भट यांनी शब्दमल्हारच्या दिवाळी अंकात करुन दिलेली. माधवी भट -- चंद्रपूरला वास्तव्य असलेल्या माधवी भट तिथल्याच लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करतात.त्यांनी नागपूर विद्यापीठात प्रबंध सादर केला आहे.विविध साहित्यीक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून आणि मासिकातून त्यांनी सदर लेखन केले आहे. सध्या त्यांचा बंगाली भाषेचा अभ्यास सुरु शब्दमल्हार --- साहित्य, संस्कृती आणि कला या विषयाला वाहिलेला *शब्दमल्हार* चा पाचवा दिवाळी अंक २०१८ ला प्रसिद्ध झाला. प्रारंभी फक्त दिवाळी अंक असेच त्याचे स्वरुप होते; मात्र वाचकांचा वाढता पाठिंबा आणि नियतकालिकांची गरज लक्षात घेऊन संपादक स्वानंद बेदरकर यांनी फेब्रुवारी २०१८ पासू ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
saeejoshi
6 वर्षांपूर्वीमन:पूर्वक धन्यवाद . होय इथे बंगाली लोक आहेत. आपला परिचय नाही. बांगला देशात कोणत्या भागात राहता ? उत्सुकतेपोटी विचारतेय. मयमनसिंग नावाचा भाग आहे का अजून तिथे ?
bookworm
6 वर्षांपूर्वीचंद्रपुरमध्ये एवढे बंगाली लोक आहेत हे माहिती नव्हतं. या लेखातून त्यांचे वेगवेगळे पैलू समजले. नोकरीनिमित्त मी सध्या बांगलादेशात असल्यामुळे विशेष उत्सुकतेने लेख वाचला व आवडला.