बाहेरुन येणारे विचार,संकल्पना,पध्दती यांना अनेकदा विरोध केला जातो,पण म्हणून हे बाहेरचे बाहेरच थांबतात का ? उलट एखाद्या वस्तूबद्दल,पदार्थाबद्दल आपलेपणाची भावना वाटू लागली की ती वस्तू,तो पदार्थही आपलाच होऊन जातो. काहीवेळा तर इतके आपले होतात की त्यांच्याशिवाय आपले पानही हलत नाही.अशाच काही बाहेरुन येऊन आपल्या पानात,जेवणात जागा पटकावणाऱ्या पदार्थांची मकरंद जोशी यांनी ‘वयम’ च्या दिवाळी अंकातील लेखात करुन दिलेली ही मजेदार ओळख. मकरंद जोशी पर्यावरण आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रात गेली पंधरा वर्षे कार्यरत असलेलं उत्साही , प्रयोगशिल व्यक्तिमत्व म्हणजे मकरंद जोशी. लेखन , निवेदन , सूत्रसंचालन या कलांमध्ये पारंगत असललेला मकरंद महाविद्यालयीन जीवनापासुन विविध माध्यमांमध्ये वावरत आहे. सन्मित्र , ठाणे वैभव , ठाणे जीवन , सा. विवेक , लोकप्रभा , नवशक्ति अशा विविध नियतकालिकांमधुन सिने – नाट्य परिक्षण , पर्यटन , प्रासंगिक मुलाखती आणि लेख लिहीणाऱ्या मकरंदने आकाशवाणी, दूरदर्शनसाठी लेखन , निवेदन केले आहे. केसरी टूर्सचे संस्थापक केसरीभाऊ पाटील यांच्या ‘प्रवास एका प्रवासाचा ’ या आत्मकथनाचे शब्दांकन करणाऱ्या मकरंदने सुहास मंत्री यांच्या ‘ दोन धृवावर दोन पावले ’ या प्रवासवर्णनासाठी लेखन सहाय्य केले आहे. हावरे बिल्डर्स यांच्या श्रमीक या सोसायटीतील पन्नास कुटुंबाची संघर्ष गाथा ‘ घर श्रमिकांचे ’ या पुस्तकात शब्द बध्द केली आहे. तर परिसस्पर्श – एक ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
bookworm
6 वर्षांपूर्वीवाः रताळे,टोमॅटो व मिरच्या ह्या आयात केलेल्या आहेत हे वाचून उडालोच. मजा आली.