पाण्यावरच्या रेघोट्या


सहज म्हणून एखादी लकेर गुणगुणावी आणि त्यातून गळ्याला गायची सवय लागावी,इतक्या सहजपणे लेखक झालेली व्यक्ती जेंव्हा वयाची ऐंशी पार केल्यावर म्हणते की लेखन म्हणजे ‘पाण्यावरची अक्षरे’ तेंव्हा त्यातील सत्य पाण्यासारखेच नितळ असते.बाल कथांपासून ते व्यावसायिक नाटकांपर्यंत विविध लेखन प्रकार हाताळणाऱ्या शशिकांत कोनकर यांनी आपल्या लेखन प्रवासात भेटलेल्या नमुन्यांचा आणि घडलेल्या किश्शांचा घेतलेला रंजक आढावा म्हणजे आनंदाचे डोही या दिवाळी अंकातील ‘पाण्यावरची अक्षरे’ हा लेख शशिकांत कोनकर --- अर्थशास्त्रापासून ते बालसाहित्यापर्यंत विपुल लेखन केलेलं असलं तरी शशिकांत कोनकर प्रामुख्याने ओळखले जातात ते नाटककार म्हणूनच.राज्यनाट्य स्पर्धेतील मृगजळावर एक सावली,खुनी पळाला काळजी नसावी,कलिकवच,पत्यातपत्ता अशी गाजलेली नाटके लिहीणाऱ्या कोनकरांनी व्यावसायिक रंगभूमीसाठी लव्हगेम,इकडे व्हिलन तिकडे मिलन,राजू तू खरं सांग,बायकोचा खून कसा करावा? हनिमून एक्सप्रेस अशी वेगवेगळ्या प्रकारची नाटके लिहीली.उचक्या,मुद्रिका,मिठीत मावणारी बायको हे त्यांचे कथा संग्रह प्रसिध्द आहेत.अकाउंटन्सीमधले जाणकार असलेले कोनकर उत्तम शिक्षक आहेत.   आनंदाचे डोही  --- गेली पंचवीस वर्षे श्रीकृपा प्रकाशनतर्फे ‘आनंदाचे डोही’ हा दिवाळी अंक प्रकाशित केला जातो.कथा, कविता, लेख,अनुभव कथन,प्रवसावर्णने,वैचारिक लेख अशा विविधरंगी साहित्याने आनंदाचे डोहीचा अंक नटलेला ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव कथन , व्यक्ती विशेष

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen