मी रात टाकली


वर्षानुवर्षे आपण ऐकतोय,पाहातोय आणि सांगतोय त्या गोष्टी आहेत ‘तो’ आणि ‘ती’ च्या …पण मग याच समाजातील ‘ते’ कुठेत ? तसंतर अर्धनारी नटेश्वरापासून आणि महाभारतातील शिखंडीपासून ‘ते’ म्हणजे तृतीयपंथी आपल्यात आहेतच.पण आपण त्यांचं अस्तित्व मानतो का ? त्यांना समाजाचा हिस्सा समजतो का ?पुरुषाचं शरीर आणि बाईचं मन ( किंवा उलटही) अशा द्विधा अवस्थेत जगणाऱ्यांचं जगणं कसं असतं? तेच उलगडण्याचा प्रयत्न केला आहे पुरुषस्पंदनंच्या अंकात भूषण कोरगांवकर यांनी ‘ मी रात टाकली ’ या सत्यावर आधारित काल्पनिक कथनातून. भूषण कोरगांवकर    --- - लेखक गेल्या १६ वर्षांपासून लावणी या विषयावर संशोधन करत असून, या विषयावरचे त्यांचे लेख शिवाय इअर विषयांवरील कथा, यापूर्वी विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या आहेत. 'संगीत बारी' हे त्यांचं पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे २०१४ साली प्रकाशित झालेले आहे. या पुस्तकाला २०१५ साली 'आपटे वाचन मंदिर' तर्फे राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाला आहे. पुरुषस्पंदनं     -----  मावा अर्थात मेन अगेन्स्ट व्हायोलन्स ॲन्ड ॲब्युज या संस्थेमार्फत ‘पुरुषस्पंदनं’ हे मासिक दरवर्षी प्रकाशित होते.ही स्पंदनं आहेत ‘माणूसपणाच्या वाटेवरची’,त्यामुळे लैंगिक भेदभाव दूर करण्यासाठी आणि स्त्री-पुरुष यांच्याबरोबर तृतीयपंथीयांचे भावविश्व,समस्या आणि जगणं याला या अंकातून नेमहीच स्थान देण्यात येते.यावर्षीच्या दिवाळी अंकामध्ये गुरुनाथ तेंडूलकर,माधव गव ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , पुरुषस्पंदनं , ट्रान्सजेंडर्स लाइफ , अनुभव कथन

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen