१९४७ साली राजकारण्यांनी नकाशावर एक रेघ ओढली आणि एका देशाचे दोन तुकडे झाले.या दोन्ही भागांमध्ये एकमेकांविषयी त्वेष आणि राग जसा आहे तसंच कुतुहल आणि औत्सुक्य ही आहे.राजवट बदलली,देशाचे नाव वेगळे झाले आणि सांस्कृतीक संदर्भ बदलले पण याचा त्या समाजावर,विशेषतः स्त्रीयांवर काय परिणाम झालाय ? सिमेपलिकडच्या स्त्रीयांचे जगणे कसे आहे? याचा प्रत्यक्ष पाहून आणि अनुभवून घेतलेला आढावा म्हणजे ‘वसा’ दिवाळी अंकातील गौरी पटवर्धन यांचा ‘ सीमेच्या पलिकडचं कराची’ हा लेख. गौरी पटवर्धन ---- गोवा कॉलेज ऑफ आर्ट आणि पुण्यातील फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्य़ूटमधून आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर गौरी पटवर्धन यांनी एन सी इ आर टी आणि यु जी सी साठी कला,शिक्षण,पर्यावरण या विषयावर मुले आणि तरुणांसाठी शैक्षणिक चित्रपट तयार केले.२००४ पासून गौरी एन आय डी – अहमदाबाद,इंडस व्हॅली स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड आर्किटेक्चर – कराची ,इन्स्टिट्य़ूट ऑफ मिडीया – कराची येथे चित्रपट निर्मिती शिकवत आहेत.सध्या बँगलोर येथील सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट,डिझाइन ॲन्ड टेक्नोलॉजी येथे फॅकल्टी ऑफ फिल्म्स म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी २०११ मध्ये तयार केलेल्या ‘मोदिखान्याच्या दोन गोष्टी’ या माहितीपटाला भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.२०१७ साली त्यांनी तयार केलेला ‘बिन सावल्यांच्या गावात ’ हा माहितीपट गाजला होता. वसा – 2003 पासून गेली 16 वर्ष वसा दिवाळी अंक सलगपणे प्रक ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
समाजकारण
, वसा
, अनुभव कथन
, स्त्री विशेष
manasi
6 वर्षांपूर्वीखूपच सुरेख लेख आहे
Apjavkhedkar
6 वर्षांपूर्वीलेख उत्तमआहे. लेखिकेचा पुणअभ्यास जाणवतो. पाकिस्तान बद्दलचे कुतुहलआपणास लेख वाचायला भाग पाडतो.