षडरिपूंमधील एक ते वात्स्यायनाने सूत्रात बांधलेला अशी काहीशी बहुपैलू प्रतिमा लाभलेला,अनेक पुराणकथांमधे उल्लेख असूनही आणि मानवी संस्कृतीत महत्वाची भूमिका बजावूनही जरा उपेक्षित असलेला देव म्हणजे ‘कामदेव’.संस्कृत साहित्यापासून ते मंदिरातील देवतेच्या स्वरुपात दिसण्यापर्यंत या कामदेवाच्या विविध रुपांचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे आरती कुलकर्णी यांनी पद्मगंधा दिवाळी अंकात ‘गेला मदन कुणीकडे ?’ या लेखात. आरती कुलकर्णी --- गेली २० वर्षे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या आरती कुलकर्णी यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केले आहे.त्याआधी त्यांनी इंडोलॉजी या विषयात एम. ए. केले आहे.एम.ए.करताना त्यांनी ‘श्रीवत्स’ या चिन्हावर संशोधनात्मक प्रकल्प केला होता.पुरातन मंदिरे,त्यांची कलात्मक बांधणी,सूर्य उपासना,कामदेव-रती हे त्यांच्या अभ्यासाचा विषय आहेत.न्युमिस्मॅटिक म्हणजे जुन्या नाण्यांचा अभ्यास करण्याचे शास्त्र हा त्यांच्या आवडीचा विषय आहे आणि याबाबतचे त्यांचे लेख ‘कॉइनेक्स जर्नल’ मध्ये प्रकाशीत झाले आहेत.आत्ता पर्यंत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अकरा रिसर्च पेपर सादर केले आहेत.तसेच विविध मराठी नियतकालीकांमध्ये त्यांनी इंडोलॉजीच्या विविध पैलूंबाबत लेख लिहीले आहेत. पद्मगंधा --- सुधांशु कुमार यांनी रेखाटलेल्या आशयगर्भ चित्रामुळे पद्मगंधाचा दिवाळी अंक मुखपृष्ठापासूनच लक्ष वेधून घेतो.डॉ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
आरती कुलकर्णी
, पद्मगंधा
, रती मदन
, पुराणकथा
[email protected]
6 वर्षांपूर्वीउत्तम व माहितीप्रद लेख व ओघवती भाषाशैली.