चला, चौकट मोडूया

संपादकीय    किरण भिडे    2018-03-10 19:29:04   

चला, चौकट मोडूया...पुनश्च सोबत! [caption id="attachment_3478" align="alignleft" width="300"] नवीन बोधचिन्ह[/caption] धुळाक्षरं कालांतरानं भूर्जपत्रांवर अवतरली तरी आपण अजून त्यांना धुळाक्षरंच म्हणतो. कारण नवं स्वीकारताना आपल्याला जून्याचा पदर घट्ट धरून ठेवायचा असतो. जे आहे ते हातचं सुटू नये आणि नवं ते मात्र मिळत रहावं. माणसाचा हा स्वभावच आहे. पुनश्चचाही तोच स्वभाव आहे. माणसाचा स्वभाव जसा चेहऱ्यावर दिसतो तसा एखाद्या उपक्रमाचा हेतू त्याच्या बोधचिन्हात उमटायला हवा. बोधचिन्ह म्हणजे हेतूचा बोध करून देणारं चिन्ह. आमचं बोधचिन्ह हा प्रवास आहे अक्षरांचा, या अक्षरांनी नोंदवून ठेवलेल्या मानवी आकलनाचा. पूनर्निमितीचे प्रतिक असलेल्या हिरव्या रंगाच्या भूर्जपत्रांवर उमटलेल्या अक्षरांचा लांबचा भूतकाळ. पुराणे,संत साहित्य यांनी अध्यात्माशी नातं जोडत माणसांना अक्षरांशी जोडून ठेवलं तो त्यानंतरचा काळ. साहित्यात समाजातील घडामोडींचं प्रतिबिंब उमटून पुस्तकांचा प्रसार झाला तो त्यापुढचा काळ आणि छापील पुस्तकांसोबतच स्मार्टफोन,टॅब,किंडल,लॅपटॉप यांतून अक्षरं उमटू लागली तो आजचा काळ.  हा काळ आम्ही सांधतो आहोत पुनश्चमधून. मराठी भाषेनं आणि मराठी माणसानं चौकटी मोडण्यात कधी हयगय केली नाही. विषय, आशय आणि दृष्टी याबाबतच्या चौकटी मोडू पाहणारी पुनश्चची काळ्या शाईतली अक्षरं आपल्याला साद घालत आहेत. चला, वर्तमानाला इतिहासाशी जोडूया, चौकट मोडूया... पुनश्च सोबत!

पुनश्च उपक्रम

प्रतिक्रिया

  1. Anjalisjoshi

      6 वर्षांपूर्वी

    छान बोधचिन्ह ??

  2. prashasnt

      7 वर्षांपूर्वी

    Good logo ?

  3. mugdhabhide

      7 वर्षांपूर्वी

    छान बोधचिन्ह

  4. ratnakarkulkarni

      7 वर्षांपूर्वी

    छान बोधचिन्ह

  5. amarpethe

      7 वर्षांपूर्वी

    छान आहे बोधचिन्ह आणि त्यामागील संकल्पना पण चांगली आहे

  6. avthite

      7 वर्षांपूर्वी

    Apratim..?? Punashchchya Kontya Navin parvachi hi naandi aahe yabaddal utsukta aahe?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen