जोडावे विवेकी जन…

नमस्कार. हा लेख लिहित असताना आज आजूबाजूला युद्धाचे सावट आहे. अशा उन्मादी वातावरणात विवेकी लोकांचाही समूह ( खरंतर नेटवर्क )  असण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. विवेकी लोकं सहसा समूहात राहत नाहीत. आजवर तशी आवश्यकता कधी त्यांना वाटलेली नाही. माफियांचे समूह असतात, विवेकी लोकांचे नाही. पण आता परिस्थिती तशी नाही. पुनश्च-बहुविध च्या माध्यमातून चांगल्या साहित्याचा दुवा धरून असाच विवेकसंपन्न लोकांचा समुदाय बनवण्याचा, त्यांना एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न आहे.

आज बरेच दिवसांनी तुमच्याशी संपर्क साधतोय. अपेक्षा आहे तुम्ही आता पुनश्च वेबसाईट आणि पुनश्च app वरून  बहुविध च्या वेबसाईट आणि बहुविध च्या app वर शिफ्ट झाला असाल. अजूनही झाला नसलात तर लगेच व्हा. पुनश्च चे login ( username/password ) वापरून bahuvidh.com वर किंवा bahuvidh या android app वर login करा. पुनश्च चे लेख आता तुम्हाला तिथेच वाचायला मिळतील. जे वाचक बहुविध वर आले आहेत त्यांना कसं वाटतंय आता? बहुविध वर तुम्हाला विषय आणि संपादक यांचं वैविध्य मिळतंय ते आवडलं का? app वरून आता पुन्हा पुन्हा login करायला लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे ना? या दोन गोष्टींबाबतचा तुमचा अनुभव नक्की कळवा. ही वेबसाईट आणि app अधिकाधिक चांगले करण्यासाठी तुमच्या अभिप्रायाचा उपयोग होईल.

गेले काही दिवस फक्त app वरून अभिप्राय देता येतात, वेबसाईट वरून अभिप्राय देता येत नाहीयेत. आपल्या डेव्हलपरच्या मते हा वर्डप्रेसशी ( ज्यावर आपली website आहे ) संबंधित प्रॉब्लेम आहे. शिवाय लेख प्रसिद्ध झाल्यावर app वर जे पूर्वी नोटिफिकेशन यायचे त्यातसुद्धा अनियमितपणा आहे. पुनश्चवर देखील सुरुवातीला हे प्रॉब्लेम होते. नंतर सर्व सुरळीत झाले होते. आता सुद्धा असेच होईल अशी अपेक्षा आहे; आणि लवकरच वेबसाईटवर अभिप्रायही देता येतील. अर्थात तोपर्यंत तुम्ही लेखाखाली असणारे लाईक चे बटन दाबू शकताच.

आता बहुविध ची साईट आणि android app झाल्यावर आपण ios म्हणजे iphone वर वापरता येणाऱ्या app वर काम सुरु केले आहे. लवकरच apple चा फोन वापरणाऱ्यांना त्यांच्या फोनवर app install करता येईल. या तिन्ही गोष्टींची तांत्रिक पूर्तता आता मार्गी लागल्यामुळे, आपण आपले लक्ष पुनश्च/दीर्घा चे सभासद जास्तीत जास्त कसे वाढतील याकडे केंद्रित केले आहे. सध्या आपले साडेतेराशे सशुल्क सभासद आहेत. हा आकडा कमीतकमी पंधरा हजार वाचकांपर्यंत वाढवायचा आहे. तस बघायला गेलो तर मराठी वाचकांचा आकडा लक्षात घेता पंधरा हजार हा काही मोठा आकडा नाही. पण अजूनही हे साडेतेराशे सभासद होताना याचा काही formula न मिळाल्यामुळे हे पंधरा हजार सभासद कसे होणार हा मोठा प्रश्न आहे. आपल्याआधी असा प्रयत्न कोणी केलेलाच नाही. बहुतेकांनी आपले साहित्य online फुकट ठेवले आहे. देणग्या, जाहिराती यावर त्यांचे उत्पन्न अवलंबून आहे. आपण मात्र चांगला उद्देश आणि व्यावसायिक दृष्टीकोन असा’ मिलाफ केल्यामुळे एकंदरीत हा साडेतेराशे ते पंधरा हजाराचा प्रवास मोठा रोचक असणार आहे हे नक्की.

त्यामुळे आता निरनिराळ्या लोकांशी भेटीगाठी चालू आहेत. त्यांचे सल्ले- कल्पना घेणे सुरु झाले आहे. करावे मनाचे हे खरे पण त्याआधी ऐकावे जनाचे हेही खरेच ना? त्यामुळे तुम्हालाही पुनश्च आणि दीर्घा दर्दी वाचकांपर्यंत पोचण्यासाठी काही अभिनव मार्ग सुचत असतील तर नक्की कळवा. या दोन्ही नियतकालिकांचा दर्जा लक्षात घेता सरसकट त्यांना वाचक मिळणे अवघड आहे हे मान्य. पण असा अभिरुची संपन्न वाचक संख्येने काही हजारात असणार हे नक्की. शिवाय तो वाचकच असेल असे नाही, तो श्रोताही असू शकतो हे ध्यानात घेऊन पुनश्च/दीर्घा चे लेख ऑडीओ स्वरुपात करण्याची पण तयारी सुरु केली आहे. आम्हाला खात्री आहे की यामुळे आपण निवडलेले हे उत्तम साहित्य जास्तीतजास्त रसिकांपर्यंत पोचेल.

पुनश्च/दीर्घा सह आपण बहुविध वर आता cinemagic, निवडक दिवाळी आणि बाल-कुमारांसाठी वयम् हे डिजिटल नियतकालिक अनुक्रमे संतोष पाठारे, मकरंद जोशी आणि शुभदा चौकर यांनी सुरु केले आहे. मार्च महिन्यात आम्ही सर्वजण तुम्हा वाचकांसाठी असेच निवडक, वाचनीय आणि बहुविविधता असणारे साहित्य घेऊन येणार आहोत. वाचकांना मिळणारा वाचनानुभव एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्याला त्यात कितपत यश येतंय हे तुमच्या प्रतिसादावरून कळणार, त्यामुळे तो देण्यात अजिबात हयगय करू नका. अगदी प्रतिसाद लिहायचा कंटाळा आला असेल तरीही लेखाखाली असलेल्या like बटनावर क्लिक केलेत तर तो लेख तुम्हाला आवडलाय एवढं तरी आम्हाला कळेल. शिवाय लेख आवडला की तो whatsapp किंवा facebook च्या माध्यमातून शेअर करण्याचा पर्याय तिथेच उपलब्ध असतो. तो वापरून असे लेख तुमच्या ओळखीच्या दर्दी वाचकांपर्यंत पोचवा. पुनश्च/दीर्घा चे सभासदत्व सशुल्क असले तरीही अवांतर या नियतकालिकाचे सभासदत्व निःशुल्क आहे. त्याचे लेख शेअर कराल तर वाचक फक्त नोंदणी करून तो आणि त्यापुढील प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचू शकतील. बाकी तुमचे सल्ले आणि सूचना यांचे स्वागत आहेच…

This Post Has 14 Comments

  1. atmaram-jagdale

    छान प्रयत्न

  2. ratnakarkulkarni

    वाचनसंस्कृती वाढावी यासाठी आपण करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे.
    साप्ताहिक सोबत चे ग. वा. बेहेरे यांचे लेख मिळाले तर पहा हि विनंती आहे

Leave a Reply