रंगोत्सवाच्या शुभेच्छा !!

संपादकीय    किरण भिडे    2019-03-21 13:28:49   

गेल्या वर्षी राजस्थानला गेलो होतो. तिथे फिरताना जाणवत होतं की आपल्यासाठी आजच्यासारखा एखादा दिवस रंगोत्सव असतो. पण त्यांच्या इथे मात्र रोजच, त्यांच्या जगण्यातच रंगोत्सव आहे. 'रंगीला राजस्थान' का म्हणतात ते मला तेव्हा उमगलं. तीन ठिकाणी फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही. अजून चांगले काढता आले असते फोटो असं आता बघताना जाणवतंय :-). असो...पुनश्च च्या वाचकांना रंगोत्सवाच्या भरपूर शुभेच्छा !! आपल्याही रोजच्या आयुष्यात अशीच निरनिराळ्या रंगांची बरसात होवो...


प्रतिक्रिया

 1. mahapokharan

    2 वर्षांपूर्वी

  छान रंगोत्सव!

 2. krmrkr

    2 वर्षांपूर्वी

  किरणजी, फोटो छान आहेत.रंगाचे मेळ सुरेख

 3. Makarand_Joshi

    2 वर्षांपूर्वी

  पुनश्चच्या माध्यमातून आपण साहित्य रंगांची उधळण अनुभवत आहोतच. ही साहित्यिक होळी अशीच रंगत,रंगवत राहो.वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.