अक्षरांचा ऐसा श्रम, केला बहुरंगी!

ललित    पांडुरंग आय्या    2020-08-13 23:11:24   

अंक - ललित : एप्रिल - मे - जून २०२०  सदर - झारा आणि सराटा अक्षरांचा ऐसा श्रम, केला बहुरंगी! कोरोनाच्या काळात लेखकांना चिंतनासाठी भरपूर वेळ मिळाला. त्या चिंतनातून आकाराला आलेले काहींचे मंथन काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले.‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘संवाद सेतू’ अशा भारदस्त शीर्षकाखाली ते प्रसिद्ध केले. हे सदर सुरू झाल्यावर मटाच्या संपादकीय विभागातील लोकांना अनेकांचे फोन सुरू झाले. असे फोन घेऊन बेजार झालेल्या एका पत्रकाराने आय्याला म्हणजे मलाच, फोन करून अनेक गमती सांगितल्या. काही साहित्यिक ‘मी संवाद सेतूसाठी लेख पाठवू का?’ असे विचारत, काही थेट मेल करून टाकत, काही व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवत, काहींना हातानेच लिहिण्याची सवय असल्याने ते लेखाच्या पानांचे फोटो काढून टाकत. ‘हे सदर फक्त निमंत्रितांसाठी आहे, आम्ही अनाहूत लेख घेत नाही’ असे सांगितल्यावर एकाने विचारले की, ‘तुम्ही कुठल्या निकषावर ही नावे निवडली आहेत? कारण तुम्ही ज्यांना साहित्यिक म्हणता ते मला साहित्यिक वाटत नाहीत.’ असा फोन करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द ‘लोकसत्ता’चे संपादक असावेत, असा संशय त्या पत्रकाराला आला, कारण मराठी लेखकांना साहित्यिक म्हणून मान्यता देण्यास ‘लोकसत्ता’चे संपादक कायमच कुरकुरत असतात. ‘आमच्या संपादकांची मान्यता मिळवायची असेल तर मराठी लेखकांना युक्रेन, पोलंड, फ्रान्स, इटली अशा देशांमध्ये जाऊन लिखाण करावे लागेल’ असे ‘लोकसत्ता’तली मंडळी बाहेर सांगत असतात. ब्लॉग रायटिंग सारखी क्षुल्लक कामे काय कोणीही करील, ‘ब्लॉग ट्रान्सलेटिंग’सारखे मराठी वाचकांच्या ज्ञानात भर घालणारे काम आज होण्याची गरज आहे’, असे हल्ली या वृत्तपत्रातील मंडळी सांगत फिरत असतात.

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित- एप्रिल-मे-जून २०२०

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen