कवितेचे कोंदण लाभलेला :किशोर पाठक

ललित    अरुण म्हात्रे    2020-08-17 10:00:30   

अंक: ललित, एप्रिल-मे- जून २०२० प्रत्येक कवी हा आयुष्याबद्दल लिहितच असतो. मात्र किशोरसारख्या एखाद्यालाच आयुष्याबरोबर मरणाचे भाकीत हे सतावीत असते आणि एखादा दैवी संकेत लाभल्यासारखा मरणावरचे असे भाष्य लिहितो की जणू त्याने आपले मरणही अनुभवले असावे. गंमत म्हणजे किशोर पाठकसारखा आनंदी, हसतमुख आणि रोमँटिक कवी आपल्या पहिल्या संग्रहातच असे काही लिहून गेला आहे हे कळल्यावर आपण चक्रावतो आणि त्याच्या अकाली जाण्याशी ह्या शब्दांचा अन्वय जोडू पाहतो. किशोर ने लिहिले आहे - आपण कसे असायचे असते आपण कसे हसायचे असते  पानावरच्या थेंबासारखे हळूच पुसून जायचे असते क्षितिजावरचे गाणे कधी डोळ्यात टिपून घ्यायचे असते हातावरच्या रेषांनाही मनात मोजून घ्यायचे असते नशीब नशीब म्हणता म्हणता हळूच कपाळ पहायचे असते.   चांदण्या सुद्धा कशा हसतात ढग सुद्धा कसा रडतो पानात सळसळ कशी येते ओठात शब्द कसा अडतो असे प्रश्न पडले की आपलेच आपण हसायचे असते.. कधी कधी उदास होऊन एक गाणे गायचे असते पापण्यांमध्ये पाणी आणून उगाच उगाच रडायचे असते   डोळ्यांनाही टिपताना हृदय पुसून घ्यायचे असते   कागदावर शाईसारखे रक्त ओतीत जायचे असते जगणं सारं संपलं की हळूच मिटून घ्यायचे असते चितेवरच्या राखेसारखे निमूट होऊन जायचे असते. समष्टीबद्दलचे ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित- एप्रिल-मे-जून २०२०

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen