शब्दांच्या पलीकडले (सदर -बिब्लिओफाईल)

ललित    गणेश मतकरी    2020-08-23 10:00:59   

अंक - ललित, एप्रिल-मे-जून २०२० १९९५ मधे बाबांनी ‘साटंलोटं’ हे नाटक लिहिलं, आणि त्याच वर्षी त्याचे बारा प्रयोग अमेरिकेत महाराष्ट्र फाउंडेशनने ऑर्गनाईज केले. या काळात मराठी नाटकांचं अमेरिकेत जाणं हे रुटीन झालं नव्हतं. सुयोग नाट्यसंस्थेने नंतर ती प्रथा पाडली, ती पुढे काही वर्षांनी. त्यामुळे या वेळी आमच्यापुढे सेट, लाइट्सचं काय करायचं, किती जणांची टीम नेणं शक्य होईल, वगैरे अनेक प्रश्न होते. नाटकात पाच कलाकार काम करणार होते. त्यात आई, बाबा आणि माझी बहीण सुप्रिया या तिघांनी भूमिका केल्या. त्यांना सोडून इतर दोन भूमिकांत सुनील तावडे आणि वैजयंती चिटणीस होते. प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी होते. त्यामुळे व्यावसायिक नाटकाला चालेलसं नेपथ्य करून ते आधी मुंबईतून अमेरिकेत नेणं, आणि मग तिथे गावोगाव फिरवणं, हे जिकिरीचंच काम होतं. त्यावर उपाय असा काढला, की गावोगावच्या महाराष्ट्र मंडळांना नेपथ्याचा आराखडा पाठवला गेला, आणि मंडळाच्या नाटकांसाठी जी व्यक्ती ही जबाबदारी पार पाडत असेल, त्यानेच त्या त्या प्रयोगासाठी नेपथ्य उभारायचं ठरलं. पण आयत्या वेळी गावात गेल्यावर काही प्रॉब्लेम उपस्थित झाले तर ते सोडवण्यासाठी, केलेलं नेपथ्य नीट लावून घेण्यासाठी, प्रकाश-योजनेसाठी/ संगीत वाजवण्यासाठी, किंवा इतर मिसलेनीअस बॅकस्टेज कामांसाठी कोणीतरी लागणारच होतं. मग बालनाट्य संस्थेत आधीपासून नेपथ्य प्रकाशयोजनेची कामं पाहणारा पण व्यवसायाने लॅन्डस्केप आर्किटेक्ट असलेला शशांक वैद्य, आणि त्याच्याच एका प्रोजेक्टवर काम करणारा मी, अशा दोघांनी जायचं ठरवलं. तो अर्थात नेपथ्य - प्रकाश पाहणार. त्याला पडेल ती मदत करायची आणि आम्ही मुंबईतून रेकॉर्ड करून नेलेलं म्युझिक नाटकात वाजवायचं, असं माझं काम होतं. हे क्यूवर संगीत ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित- एप्रिल-मे-जून २०२०

प्रतिक्रिया

  1. jrpatankar

      5 वर्षांपूर्वी

    खूपच छान. शेवटचा परिच्छेद तर फारच छान.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen