अंक : ललित, एप्रिल-मे-जून २०२० १९८४ पासून विलेपार्ल्यात सुरू झालेल्या ‘मॅजेस्टिक गप्पा’ या मुंबईतील-प्रामुख्याने उपनगरातील एक सांस्कृतिक सोहळाच असतो जणू. *** शुक्रवार, ७ फेब्रुवारी २०२० : सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांची प्रकट मुलाखत यंदाच्या ३७ व्या वर्षातल्या मॅजेस्टिक गप्पांची सुरुवात ७ फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांच्या प्रकट मुलाखतीने झाली. ‘शाळा’, ‘गवत्या’ ‘समुद्र’, ‘एकम्’, ‘मार्ग’ या कादंबर्या तसेच ‘उदकाचिया आर्ती’, ‘झेन गार्डन’ हे त्यांचे कथासंग्रह आहेत. मिलिंद बोकील हे शांत, संयमी आणि मूलतः अबोल असे साहित्यिक आहेत. कवयित्री नीरजा यांनी त्यांची मुलाखत घेतली. ‘‘वयाच्या एकविसाव्या वर्षी मी ‘किर्लोस्कर’ मासिकात ‘पुन्हा सूर्य, पुन्हा प्रकाश’ ही कथा लिहिली. खरं सांगायचं झालं तर मला लहानपणापासून लेखकच व्हायचं होतं आणि लेखकाचं विश्व काय असतं, त्याची मानसिक जडणघडण काय असते, त्याचं ब्रीद काय असतं यासंबंधीचे सर्व आडाखे मनात आपसूकच तयार झाले होते. खरंतर मी इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम घेतला परंतु नंतर लक्षात आलं की हे आपलं काम नाही आणि माझ्या याच अनुभवावर ही माझी पहिली कथा होती.’’ अशी सुरुवात मिलिंद बोकील यांनी आपल्या साहित्यिक जडणघडणीविषयी बोलताना केली. ‘‘अनेक वाचकांना ‘शाळा’ म्हणजे माझं आत्मचरित्रच आहे असं वाटतं, परंतु ते काही खरं नाही. प्रथम पुरुषी एकवचनी साहित्य लिहिलं की अनेकांना ते आत्मचरित्रात्मक आहे असंच वाटतं, हा फार मोठा धोका आहे. ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .