दृष्टिक्षेप


अंक : ललित, एप्रिल-मे-जून २०२० ******** चैतन्य पंचक नेत्र-कर्ण-नाक-जिव्हा-त्वचा ही पाच इंद्रियांची अधिष्ठाने आहेत. इंद्रियांद्वारे परिस्थितीची जाणीव होते, ज्ञान प्राप्त होते. त्या आकलनाद्वारे माणूस निर्णय घेतो, हे आपण शालेय पातळीवर शिकलेलो असतो. परंतु ‘पंचेंद्रियांनी अनुभवलेल्या जीवनजाणिवा मानवी जगण्याला कलात्मकतेची उंची प्राप्त करून देतात. निसर्गाच्या प्रसन्न सान्निध्यात आणि मोकळ्याढाकळ्या ग्रामीण विश्वात वाढलेल्या लेखकाला या जीवनजाणिवा आणखी प्रगल्भ करतात. हे जेव्हा आपण ‘चैतन्य पंचक’ या प्रा. व. बा. बोधे यांच्या ललितगद्याच्या मलपृष्ठावर वाचतो, तेव्हा हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. ‘रंगलो मी रूपरंगी’, ‘गंधाची जादुई दुनिया’, ‘असेच नवथर स्पर्श दिवाणे’, ‘जीभ : रसास्वादाचे महाद्वार’ आणि ‘ध्वनीतून पाझरते नादब्रह्म’ अशा पाच लेखांचे पुस्तक म्हणजे ‘चैतन्य पंचक’. सुरुवातीलाच या पुस्तकाचे वैशिष्ट्य नमूद करायला आवडेल की या पुस्तकातील कोणतेही पान उघडून आपण वाचू शकतो आणि मग मात्र वाचतावाचता शेवटपर्यंत वाचनात गुंगून जातो. लेखक बोधेंनी ज्या सक्षमतेने आपल्या पंचेंद्रियांच्या अनुभवांना चित्रित केले आहे, त्यांची ती शैली वाखाणण्याजोगी आहे. साक्षात तो त्यांचा अनुभव आपण अनुभवू शकतो. उदा. कागदांचा स्पर्श मला आवडतो. फेंट पिवळा कागद थोडा खरखरीत असतो. वर्तमानपत्राचा कागद लगदा सुकविल्यासारखा असतो. मला पेपरचा खरमरीत आवाज मारणारा स्पर्श आवडतो. आर्टपेपरचा गुळगुळीत स्पर्श लाजवाब. पाण्यापासून पुस्तकाचं रक्षण करण्यासाठी लॅमिनेशन चकचकीत नि हळुवार असतं. जर्नल पेपर कसे कोरे करकरीत नि टक्क डोळ्यांनी बघत असतात. जुन ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित- एप्रिल-मे-जून २०२०

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen