इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी मराठी माध्यमाच्या शाळांसमोर आणि पर्यायाने मराठी भाषेसमोर आव्हान उभे केले असले तरी आजही महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण व प्रयोगशील शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असलेल्या अनेक मराठी शाळा आहेत. अशा शाळांचा मराठी भाषकांना परिचय व्हावा या हेतूने ‘माझी शाळा, मराठी शाळा’ हे सदर सुरू करणार आहोत. आपण आपल्या शाळेची, शाळेच्या उपक्रमांची व आजवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती छायाचित्रासह पाठवू शकता. चांगल्या चालणाऱ्या मराठी शाळांच्या कामाची दखल घेतली जावी व त्यांच्या अनुकरणीय उपक्रमांचे सार्वत्रिकीकरण व्हावे हा यामागे मुख्य हेतू आहे. शाळेचा परिचय पाठवताना शाळेचा संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, स्थापनावर्ष, संस्थेचे तसेच मुख्याध्यापकाचे नाव, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची संख्या आदी तपशील देण्यास विसरू नका.
आमचा पत्ता - [email protected] मराठी प्रथमचे वर्गणीदार होण्यासाठी भेट द्याः http://bahuvidh.com/marathipratham संपा. डॉ. प्रकाश परब ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .