मराठी अभ्यास केंद्र ही मराठी भाषेचे प्रश्न घेऊन त्यांची लोकशाही मार्गाने तड लावणारी स्वयंसेवी संस्था आहे. अभ्यास हा ह्या संस्थेचा पाया असला तरी मराठीसाठी रस्त्यावरची आंदोलनेही केंद्राने केली आहेत. मग तो मराठी शाळांसाठीचा लढा असेल किंवा मुंबई विद्यापीठात पत्रकारितेचा पाठ्यक्रम मराठीतूनही उपलब्ध होण्यासाठी केलेले आंदोलन असेल. आज मराठी भाषा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आहे. मराठी शाळा बंद पडत असून त्याचा परिणाम माध्यम म्हणून किंवा एक विषय म्हणून उच्च शिक्षणातील मराठीवरही होत आहे व तो यापुढे आणखी तीव्र होणार आहे. आजचे वास्तव असे आहे की मराठी विषय घेऊन उच्च शिक्षण घेतलेल्या सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील मुलामुलींना नोकरीसाठी वणवण भटकावे लागत आहे. शिक्षक पदांची भरती रखडलेली आहे व इंग्रजी माध्यमाच्या वाढत चालेल्या शाळांमुळे मराठी विषयाच्या शिक्षकपदांची संख्याही कमी झाली आहे. अशा स्थितीत मराठी मुलांनी नोकरी करायची तर ती कुठे? मराठी विषयात नेटसेट व पीएचडी झालेल्या आमच्या तरुणांवर शेतात मजुरी करण्याची किंवा रिक्षा चालवून उदरनिर्वाह करण्याची नामुष्की आली आहे. समाजमाध्यमामधून अशा मराठी उच्च शिक्षित बेरोजगार तरुणतरुणींच्या करुण कहाण्या ऐकायला मिळतात तेव्हा विलक्षण यातना होतात. राज्यात मोठ्या प्रमाणात मराठी शाळा बंद पडत आहेत आणि त्यांच्या जागा इंग्रजी माध्यमाच्या शाळा घेत आहेत. मराठी शाळा टिकल्या नाहीत तर उच्च शिक्षणातील मराठीही टिकणार नाही हे उघड आहे. तेव्हा आतापासूनच सावध होऊन पावले उचलण्याची आवश्यकता आहे. मराठी अभ्यास केंद्र यासंदर्भात वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करीत असून आम्हांला मराठीचे कायम, कंत् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Prashant Chaudhari
4 वर्षांपूर्वीअशा स्वरूपाचे काम करणे अपेक्षित आहे याबाबत अधिक सूचना प्राप्त झाली तर बरे होईल