भाषिक समस्या कळवा - मराठीचा विकास घडवा


मराठी अभ्यास केंद्र गेली अनेक वर्षे मराठी भाषेचे प्रश्न घेऊन अभ्यास व चळवळ या आघाड्यांवर काम करीत आहे. शिक्षण, प्रशासन, न्यायालये, विज्ञान व तंत्रज्ञान, उद्योग व वाणिज्य आदी विविध क्षेत्रांतील मराठी भाषेपुढील आव्हानांची व समस्यांची केंद्राला कल्पना आहे. केंद्राचे विविध कृतिगट एकेक व्यवहारक्षेत्र घेऊन मराठी भाषेपुढील समस्यांवर काम करीत आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अशाप्रकारे संस्थात्मक व व्यक्तिगत पातळीवर काम करणारे अनेक मराठीप्रेमी आहेत याची आम्हांला कल्पना आहे. त्यांच्याशी जोडून घेऊन मराठीचे इतरही अलक्षित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र प्रयत्नशील आहे. केंद्राच्या संपर्कात नसलेल्या पण मराठीसाठी काम करणाऱ्या व काम करू इच्छिणाऱ्या मराठीप्रेमींना आवाहन आहे की, आपण  आपल्या भागातील किंवा क्षेत्रातील मराठीविषयक समस्यांची, अडचणींची माहिती आम्हांला कळवा. मराठी प्रथम हे आपल्या हक्काचे विचारपीठ आहे. आपण कळवलेल्या समस्यांना प्रसिद्धी तर दिली जाईलच पण शासनस्तरावर त्यासाठी पाठपुरावाही केला जाईल.

आमचा ई-पत्ताः [email protected] मराठी प्रथमचे वर्गणीदार होण्यासाठी भेट द्याः http://bahuvidh.com/marathipratham संपा. डॉ. प्रकाश परब   ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen