संपादकीय – ओळख भाषेची, मराठी महाराष्ट्राची!

राज्य मराठी विकास संस्थेने तिच्या उद्दिष्टांप्रमाणे मराठीच्या नियोजनबद्ध विकासाला प्राधान्य देऊन काम करण्याऐवजी म्हणींतून कथालेखनाच्या स्पर्धा घेण्याचे महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केले आहेत. हे मराठी भाषेच्या संवर्धनाचे नव्हे तर जतनाचे काम आहे. मंत्रालयातील मराठी भाषा विभागाला भाषेचा ‘विकास’ करायचा  म्हणजे काय काय करायचे असते  हेच ठाऊक नाही किंवा  ठाऊक असले तर  तो करायचा नाही असे काही तरी आहे. भाषेचे जतन आणि भाषेचे संवर्धन ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून प्रगत व्यवहारक्षेत्रांत भाषेचा विकास आपोआप होत नसतो तो जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक करायचा असतो आणि त्यासाठी काही एक भाषाधोरण लागते. कृतिकार्यक्रम लागतो. राज्याला भाषाधोरण आहे कुठे? गेल्या सहा वर्षांत भाषाधोरणाचे भिजत घोंगडे पडले आहे. त्याला मुहूर्त मिळत नाही. कारण राजकीय इच्छाशक्ती नाही. कारण समाजाचा रेटा नाही. मराठीहिताचा दावा करणाऱ्या शिवसेनेने, मनसेने मराठी भाषेचे धोरण जाहीर करा नाहीतर खुर्च्या खाली करा असा आग्रह धरल्याचे कोणी ऐकले आहे काय? महाराष्ट्रात मराठी विद्यापीठ, मराठी भाषा भवन नसले तरी चालेल पण अयोध्येत राम मंदिर मात्र झालेच पाहिजे. हिंदुत्वाच्या राजकारणाने मराठी भाषेचे अपरिमित नुकसान झाले आणि ते मराठी समाजाच्या अजूनही लक्षात येत नाही. बहुसंख्य लोकांना आजही भाषेऐवजी जात, धर्म हीच सामाजिक ओळख महत्त्वाची वाटते म्हणूनच राजकीय पक्षांना जातिधर्माचे राजकारण सोडावेसे वाटत नाही.

 

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has One Comment

  1. सर मराठी भाषेसाठी आपली तळमळ कित्येक वर्षांची आहे, अनेक वर्ष त्यासाठी तुम्ही झटत आहात ,मराठी प्रथमच्या माध्यमातून तुमच्या सत्कार्यास आणखी उभारी मिळेल. एका भाषा तज्ञाने या कामात वाहून घेणं आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी, आपणास अगणित शुभेच्छा!

Leave a Reply

Close Menu