‘प्रवास’ गोष्टींच्या पुस्तकांतला अन् पुस्तकांचा!

गोष्टीत ‘प्रवास’ असणे अनिवार्य होते. मुलांनी वर्गात थोडा विचार करून पहिला. आराखडा घरून लिहून आणला. काहींना काहीच सुचलेले नव्हते. त्यांना जरा स्टार्टअप मिळावा म्हणून इतरांना त्यांच्या कल्पना वर्गात मांडायला सांगितल्या. मुलांच्या सुरुवातीच्या कल्पना ऐकून खरे तर मी जरा हिरमुसलेच. त्यांत काहीच नावीन्य नव्हते. बहुतेकांच्या गोष्टींमधील पात्रे जंगलातून प्रवास करत होती आणि मग रस्ता चुकला, गाडी बंद पडली, वाघ आला वगैरे वगैरे. नॉट डन! मग काय काय प्रकारचे प्रवास असू शकतात आणि कुठे कुठे याबद्दल जरा गप्पा झाल्या. प्रवास जंगलातच हवा असे नाही, वाळवंटातही होऊ शकतो, पृथ्वीवरच नाहीतर आकाशात, अवकाशातही होऊ शकतो. माणसांचाच नाही, तर प्राण्या-पक्ष्यांचा, किडा-मुंगीचा, भूत-हडळींचा, परग्रहवासियांचाही असू शकतो, पात्रांची नावेही राजू-मीनापेक्षा वेगळी असू शकतात, असे सगळे लोणी मेंदू घुसळून बाहेर आले. नव्या कल्पना गोष्टींमध्ये आणण्याचे आव्हान मुलांनी स्वीकारले.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'मराठी प्रथम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'मराठी प्रथम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. खूपच छान

  2. मस्त! 🙂

Leave a Reply

Close Menu