मोठ्या इंग्रजी शाळांमधले ‘इंटरव्ह्यू’ मुलांनी छान दयावेत म्हणून मोठ्या शहरांतून आजकाल दुकानंही उघडलीत! इथे पालक आणि मुलं यांना कृत्रिम आणि खोटं-खोटं बोलणं शिकवलं जातं. या सगळ्यात सहज, स्वाभाविक, उत्स्फूर्त अशा भाषेपासून आपण मुलांना दूर नेतोय आणि त्यामुळे मुलांची भाषा बेगडी होत चालली आहे. भाषेचं हे बेगडीपण त्यांच्या आयुष्यात झिरपत चाललंय. आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा भाषा हा महत्वाचा घटक असतो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण मातृभाषेच्या माध्यमातून होते, हे सत्य बाजूला सारून आपण परक्या भाषेच्या प्रचंड आहारी गेलो. ‘इंग्रजीत शिकवूनही मुलांची मराठी आम्ही जपू’ हा मराठी भाषकांचा दावा फोल ठरला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज अनपेक्षितपणे एका वाहिनीवर पुन्हा ‘हिंदी मीडियम’ हा चित्रपट पाहिला. आणि मराठीत थेटपणे मराठी शाळांची बाजू घेणारा चित्रपट उभा राहू शकला नाही याची खंत वाटली. (मध्यंतरी ग्रामीण भागातील शाळांचा प्रश्न ‘घुमा’ या चित्रपटातून आला होता, हे इथे स्मरते.)
‘हिंदी मीडियम’ या चित्रपटातून आरटीईअंतर्गत बडया शाळांमधून वंचित घटकांमधील मुलांना २५ टक्के आरक्षण हा मुद्दा आला आहे नि त्याचबरोबर सरकारी शाळा जगवण्याचा मुद्दाही आहे. वंचितांच्या कोट्यातून मुलीचा बडया शाळेत प्रवेश घेणारा नायक शिक्षणातल्या दांभिकपणाचा मुखवटा खरवडून काढतो. ए ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Rdesai
6 वर्षांपूर्वीबरोबर आहे .