आपल्या समाजात मंदिर-देवळांच्या जीर्णोद्धाराकरिता, देवस्थानांच्या विकासाकरिता निधी देण्याची परंपरा आहे. अनाथाश्रमांकरता देणग्या देण्याची परंपरा आहे, पण मराठी शाळांना आर्थिक मदत करण्याची सवय नाही. याचे एक मोठे कारण म्हणजे उच्चभ्रू वर्ग केव्हाच मराठी शाळांपासून दूर गेला आहे. या वर्गाने आपल्या मुलांसाठी इंग्रजी शाळा निवडल्यामुळे आता आपला मराठी शाळांशी काही संबंध आहे असे या वर्गाला वाटत नाही, किंबहुना हा विषयच मग त्यांच्या कक्षेतला उरत नाही. काहींना अपराधगंड वाटत राहतो आणि ते अजूनच मराठी शाळांच्या विषयापासून दूर जातात...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मागील लेखाची सुरुवात मी 'हिंदी मिडियम' या चित्रपटाच्या संदर्भापासून केली होती. आज या लेखात या चित्रपटाच्या शेवटाबद्दल आधी लिहिते. चित्रपटाचा नायक पश्चात्ताप म्हणून सरकारी शाळेचा कायापालट करायचे ठरवतो, इतकंच नाही तर सतत चकचकीत बड्या शाळांच्या बाजूने असणारी त्याची बायकोच आपल्या मुलीला या शाळेत घालायचे ठरवते. मोठया शाळांचा सोस असणारा पांढरपेशा मराठी भाषक समाज महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदांच्या तर बाजूलाच ठेवू खाजगी अनुदानित मराठी शाळांमध्ये तरी आपल्या मुलांना किती घालेल हा प्रश्नच आहे. या अर्थाने वरील चित्रपटाचा शेवट स्वप्नवत वाटला तरी तो तसा करणे हे आतून दिलासा देऊन गेले.आपल्या समाजात मंदिर-देवळांच्या जीर्णोद्धाराकरिता, ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Rdesai
6 वर्षांपूर्वीखरं आहे .
vilasingle
6 वर्षांपूर्वीइंग्रजी आणि सेमी इंग्रजी याला कर लावणे योग्य होणार नाही कारण मुळातच बहुतांश स्वयंघोषित इंग्रजी शाळाच बेकायदेशीर असून त्या प्रस्थापित मराठी शाळांना गिळंकृत करत आहेत. कर आकारणी करून उलट फोफावतील यात शंका नाही.
arvindjadhav
6 वर्षांपूर्वीअभ्यासपूर्ण विश्लेषण
6 वर्षांपूर्वी
अगदी योग्य विश्लेषण??
Unmesh ramchandra
6 वर्षांपूर्वीमराठीत आपण शाळेला विद्यामंदिर असेही म्हणतो. पण त्याचा अर्थ लोकांच्या मनात पोहोचला नाही असे वाटते. बऱ्याच गावांमध्ये गावातल्या देवळाला कुणी संगमरवरी पायऱ्या करतो, कुणी मूर्तीला चांदीचे डोळे लावतो, कुणी देणगी देऊन तिथे स्वतःचे नाव कोरतो पण त्याच गावातली शाळा - विद्येचे मंदिर मात्र दुरवस्थेत असते. या विषयावर इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात एखादा धडा घातला तरी उत्तरे पाठ करून मार्क मिळवतील सगळे, पण परिस्थितीत फरक काही पडणार नाही. म्हणून मला वाटते इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा १०० रुपये 'मराठी शाळा विकास कर' आकारला जावा. सेमीइंग्रजी साठी हा ५० रुपये असावा.
Satej Deshmukh
6 वर्षांपूर्वीHi