नाटक, चित्रपट ही समाज प्रबोधन करू शकणारी प्रभावी माध्यमं आहेत. वेगवेगळ्या सामाजिक समस्या हाताळून या माध्यमांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे. कला आणि सामाजिक भान यांचा उत्कृष्ट मेळ असलेल्या कलाकृतींना प्रेक्षकही उचलून धरतात. अशीच एक कलाकृती मराठी शाळांची समस्या घेऊन रंगमंचावर आली आहे. मी मराठी शाळा बोलतेय... ह्या बालनाट्यातून मांडण्यात आलेली मराठी शाळांची आणि पर्यायाने मराठी भाषा तसेच संस्कृतीची व्यथा अंतर्मुख करणारी आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------मातृभाषेतून शालेय शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय गेल्या काही वर्षांपासून भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये सातत्याने व जाणीवपूर्वक दुर्लक्षिला जातोय. महाराष्ट्रात आहोत म्हणून आपण 'मराठी शाळा' असा प्रामुख्याने उल्लेख करीत असतो. लहान मुलांसाठी कोवळ्या वयात एक इंग्लिश विषय नीट शिकणे व सर्व विषय इंग्लिशमध्ये शिकणे या दोन गोष्टींमध्ये अनेक पालकांची गल्लत होताना दिसतेय. हा विषय मुख्यतः शैक्षणिक असला तरी त्याला राजकीय, सामाजिक व आर्थिक परिमाणे तसेच कारणेही आहेत. अनेक व्यक्ती व संस्था हा ज्वलंत विषय आपल्या ताकदीनुसार व क्षमतेनुसार समाजासमोर व सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, शासकीय अन ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
साधना गोरे
6 वर्षांपूर्वीआपलं लेखन आमच्या मेलआयडीवर पाठवा. नक्की विचार केला जाईल. मात्र ते लेखन कथा, कविता अशा ललित साहित्यप्रकारातले नसावे. आमचा मेलआयडी 'आपणही लेखन करू शकता', या पोस्टमध्ये देण्यात आलेला आहे.
डॉ. गंगाराम गणपत ढमके
6 वर्षांपूर्वीनमस्कार सर , मी डॉ.गंगाराम गणपत ढमके मला आपल्या अँप मध्ये लेखन करण्याची इच्छा आहे. कृपया आपण मला संधी देऊ शकता का. मी सकाळ वृत्तपत्रात लेख लिहितो, माझी स्वतःचे कथासंग्रह, लेखसंग्रह आणि कविता संग्रह अशी तीन पुस्तके प्रकाशित आहेत.आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर मी चिंतन सादर करतो.
प्रसाद गोखले
6 वर्षांपूर्वीधन्यवाद.रत्नागिरीतही नक्कीच प्रयोग होईल. रमेश वारंग यांच्या पर्यंत पोहोचवतो
[email protected]
6 वर्षांपूर्वीज्ञानभाषा व्हायच्या सगळ्या क्षमता मराठी माऊलीत आहेत, हेच आज समजेनासे झालेले आहे. आपलं मराठीवर प्रेम आहे पण विश्वास नाही. तो ठेवून बघायला हवा. मराठी शाळा हातात दिवा घेऊन उभी आहे, त्या प्रकाशात खूप दिसेल. आईच्या ओंजळीतल्या दिव्याला उब आहे आणि सोबत तिच्या पदराची माया पण. खूप शुभेच्छा! रत्नागिरीला प्रयोग नक्की करूया. - डॉ. निधी पटवर्धन, रत्नागिरी