सेमी-इंग्रजीची सक्ती कशासाठी?


बुलढाण्याचे विलास इंगळे गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अत्यंत तळमळीने व चिकाटीने कार्य करीत आहेत. कधी वैयक्तिक तर कधी संघटनात्मक पातळीवर मराठीवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. प्राथमिक मराठी शाळांवर कधी उघड तर कधी आडमार्गाने लादले जात असलेले सेमी-इंग्रजी माध्यम हा त्यांच्या विशेष मोहिमेचा भाग आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक मराठी शाळांवर नियमांचे पालन न करता लादले जात असलेले सेमी-इंग्रजी हाणून पाडण्यासाठी त्यांनी संबंधितांकडे पत्रव्यवहारही केलेला आहे. पूर्वी माध्यमिक आणि आता प्राथमिक स्तरावर होत असलेले सेमी-इंग्रजीचे अतिक्रमण हे बालकांच्या मातृभाषेतून शिकण्याच्या हक्काचे उल्लंघन आहे असे त्यांचे मत आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मातृभाषा हीच प्राथमिक शिक्षणाचे स्वाभाविक व अपेक्षित माध्यमभाषा असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र इंग्रजी माध्यमाचे प्राबल्य आहे. एकीकडे मराठी माध्यम तर दुसरीकडे इंग्रजी माध्यम अशा विषम स्पर्धेत मराठी शाळांची अवस्था दिवसेंदिवस कठीण बनत चालली आहे. त्यात सेमी-इंग्रजी हे एक फॅड मराठी शिक्षणाच्या मुळावर आले आहे. गणित, विज्ञान यांसारखे संकल्पनात्मक विषय मातृभाषा मराठीऐवजी इंग्रजीतून शिकण्याची सक्ती अनेक शाळांमधून केली जात आहे. त्याचा फायदा कोणाला किती होतो किंवा झाला आहे याचा विचार न करता सरसकट अशा अशास्रीय माध्यमाची सक्ती अजाण बालकांवर करणे ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. रंजना चौधरी ,,रायगड जिल्हा परिषद शाळा बांधिवली कर्जत

      6 वर्षांपूर्वी

    अगदी बरोबर आहे पण आमच्या शाळेत सेमीइंग्रजी केल्यामुळे पटसंख्या वाढली,

  2. vilasingle

      6 वर्षांपूर्वी

    प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यभाषेतील शिक्षणासच सर्वाधिक महत्त्व देणे हेच शासनाचे कर्तव्य आहे. इंग्रजी ह्या परकीय व घटनेच्या परिशिष्ट-८ मध्येही समाविष्ट नसलेल्या भाषेला अनाठायी महत्त्व देऊन इंग्रजी माध्यमातील शाळांवर जनतेचा पैसा खर्च करण्याचे तर मुळीच कारण नाही. मराठी शाळांत इंग्रजीचे उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्न नक्की व्हावा. मात्र स्थानिक भाषेला शिक्षणक्षेत्रात सर्वाधिक महत्त्व मिळालेच पाहिजे. ज्या पालकांना आपल्या मुलांना इंग्रजी किंवा इतर माध्यमांतून शिक्षण द्यायचे असेल त्यांनी ती हौस स्वतःच्या कुवतीवर भागवावी, सरकारी पैशावर नव्हे.“



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen