सध्या समाज माध्यमांवर इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आलेला संख्यावाचनासंबंधीचा बदल मोठ्या प्रमाणात चर्चिला जातोय. या पार्श्वभूमीवर मराठीप्रेमी अनिल गोरे यांनी मराठी समाजाला केलेले हे मुद्देसुद आवाहन
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------मराठी संख्या वाचनात जोडाक्षरांचा अडथळा येतो, विद्यार्थ्यांना जोडाक्षरे उच्चारण्यात समस्या येते असा दावा करून शालेय विद्यार्थ्यांना संख्या वाचनाची नवी आणि वेगळी पद्धत शिकवावी, असा सल्ला महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीशी संबंधित गणित अभ्यास मंडळातील तज्ञांनी दिल्याचे समजते. या निर्णयाची समाजात कोणती व्यापक चर्चा झाली, ती कोणत्या पातळीवर झाली, सदर चर्चेत शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षण खात्यातील अधिकारी सहभागी होते का याची माहिती प्रसिद्ध झालेली नाही. संख्या वाचनातील ही नवी पद्धत थेट पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून जाहीर करण्यात आली आहे. या नव्या पद्धतीनुसार ६३ त्रेसष्ठ, ७३ त्र्याहत्तर किंवा ३२ बत्तीस या संख्यांचे वाचन अनुक्रमे साठ तीन, सत्तर तीन किंवा तीस दोन असे करावे हे इयत्ता दुसरीच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकात म्हटले आहे.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
मराठी संख्यावाचनाचा वाद - १
मराठी प्रथम
प्रा. अनिल गोरे
2019-06-20 10:00:14
Rdesai
6 वर्षांपूर्वीयोग्य विचार आहेत.उगीचच उच्चारांचा बागुलबुवा सांगितला जातो .मुले शिकवतील तसे उच्चार करीत असतात.
साधना गोरे
6 वर्षांपूर्वीहो लिंक पाठवा, आम्हालाही आपली मते जाणून घ्यायला आवडेल.
shripad
6 वर्षांपूर्वीयोग्य विचार मांडले आहेत. मी यावर एक लेख लिहून पाठवला आहे. प्रकाशित झाला तर लिंक देईन.
Shyam
6 वर्षांपूर्वीएक ही मुद्दा पटत नाही. विषय गणित आहे. मुले दुसरी तली आहेत. भाषा हा विषय च नाही.