मराठी संख्यावाचनाचा वाद - ३


सध्या समाज माध्यमांवर इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आलेला संख्यावाचनासंबंधीचा बदल मोठ्या प्रमाणात चर्चिला जातोय. मराठी प्रथमवर आपण या वादचर्चेची लेखमालिका क्रमाने प्रकाशित करणार आहोत. ह्या मालेतील  निलेश निमकर यांचा  हा लेख...

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकात दोन अंकी संख्यांच्या नामात केलेला बदल सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकवीस, बावीस या ऐवजी वीस एक, वीस दोन अशी पर्यायी संख्यानामे पाठ्यपुस्तकात सुचवली आहेत. अनेक जणांना हा बदल अजब वाटतो आहे. या संख्यानामांतील बदलामुळे मुलांना नेमके काय म्हणायला शिकवायचे याबाबत शिक्षक आणि पालक यांच्यात बराच गोंधळ उडालेला दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर हा बदल का करण्यात आला आहे हे समजून घेणे अगत्याचे ठरेल.

मराठी आणि बऱ्याचशा उत्तर भारतीय भाषांत शंभरपर्यंतच्या संख्यांच्या नावांमध्ये फारशी सुसंगती आढळत नाही. पुढील काही उदाहरणे ही विसंगती लक्षात यायला पुरेशी ठरावीत. एकक स्थानी २ असणाऱ्या या संख्यांची नावे पाहा. बावीस, बत्तीस, बेचाळीस, बहात्तर, ब्याण्णव. बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की एकक स्थानची २ ही संख्या वाचताना आपण बा, बत्, बे, ब, ब्या असे वेगवेगळे उच्चार करतो आहोत. आता जी बाब  दोनाच्या बाबतीत आहे, ती इतरही संख्यांच्या बाबतीत खरी आहे हे सहजच लक्षात येईल. आपण बेचाळीससारखी संख्या लिहिताना आधी चाळिसातील चार लिहितो आणि न ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

  1. Shyam

      3 वर्षांपूर्वी

    छान ! बदल भारतीय लोकांना आवडत नाहीत. पण सर्व सामान्य लोकांचा विचार फक्त तळमळीचे विचारवंतच करू शकतात.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen