मराठी संख्यावाचनाचा वाद - ४


सध्या समाज माध्यमांवर इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आलेला संख्यावाचनासंबंधीचा बदल मोठ्या प्रमाणात चर्चिला जातोय. मराठी प्रथमवर आपण या वादचर्चेची लेखमालिका क्रमाने प्रकाशित करत आहोत. ह्या मालेतील  निरंजन विकास यांचा  हा लेख...

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इयत्ता दुसरीच्या पुस्तकांमध्ये संख्यावाचनाचे नवे पर्याय विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार असल्याचं लक्षात आल्यावर जनमानसात खळबळ उडाली. जनतेच्या तीव्र प्रतिक्रियांमागे केवळ पारंपरिक संख्यावाचनाला बसलेला धक्का हे एकमेव कारण होतं. या नव्या पर्यायांच्या समर्थनार्थ मांडण्यात आलेल्या मुद्द्यांचं तार्किक आणि तात्त्विक पातळीवरील खंडन होणं आवश्यक आहे. त्यासाठी हा लेखनप्रपंच.

सर्वप्रथम या नव्या पद्धतीची तर्कदुष्टता पाहू. या पद्धतीप्रमाणे २५ या संख्येचं वाचन पंचवीस असं करणं हे शालेय विद्यार्थ्यांना अवघड जात असून, त्याहून सुलभ वाचन 'वीस पाच' असं असेल आणि हा केवळ एक पर्याय असून, पंचवीस असं वाचन चूक ठरवण्याचा नव्या पद्धतीचा उद्देश नाही. या पद्धतीतील वाचन कठीण जाण्यामागे कारण काय? तर पंचवीस या शब्दात पाच आधी येतात व वीस नंतर येतात आणि संख्येमध्ये मात्र विसातील २ आधी तर ५ चा आकडा नंतर येतो. ही विसंगती मुलांना पचवता येत नाही आणि म्हणून मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना गणित हा विषय इंग्रजी माध्यमात शि ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. SunilJoshi

      6 वर्षांपूर्वी

    ह्या सर्व लेखांमधे वापरलेली चित्रे पाहता त्यात सगळीकडे पंचवीस / छत्तीस असे छापले आहेच. त्यामुळे वीस पाच किंवा तीस सहा ही पद्धत संकल्पना समजण्या साठी चांगली व चटकन आकलन होणारी आहे. उगाचं विरोध कशासाठी?

  2. सर्वांची संतोष ढाणे

      6 वर्षांपूर्वी

    सभासद करून घेण्यात यावे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen