अशीही आमची अद्भुतरम्य नभसफारी!

“१५ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर इयत्ता १ ली ते ४ थीच्या मुलांसोबत या विषयाला अनुसरून गप्पा करण्यास सुरुवात झाली. तेव्हा ‘आकाश’ हा शब्द ऐकल्यावर काय आठवते? प्रदर्शनात काय- काय मांडता येऊ शकते? अवकाश तयार करण्यासाठी मांडणीचा विचार कसा करता येईल?  प्रदर्शनाची वेळ कोणती असावी या सर्व बाबींचा मुलांसोबत विचार केला गेला. ‘आकाश’ म्हटल्यावर काय आठवते असे मुलांना विचारल्यावर  परी, राक्षस, देव, आत्मा, भूत, सुपरमॅन, पॅराग्लायडिंग याबरोबरच ढग, पाऊस, इंद्रधनुष्य, ग्रह, तारे, अवकाशयान, अंतराळवीर, एलियन्स, कृष्णविवर, यमराज, तुटता तारा, देवाकडे गेलेली माणसे असे अनेकविध प्रतिसाद मुलांनी दिले. ते ऐकून आम्ही सर्व ताई अवाकच झालो. युट्यूबवरील चित्रफितींमधून  अवकाशयानात खगोलशास्त्रज्ञ कसे राहतात, काम कसे करतात, आकाश, ग्रह, सूर्यमाला याविषयीची सर्व माहिती मुलांनी ताईंसोबत समजून घेतली. याकरिता ताऱ्यांचे अंतरंग, आकाशाशी जडले नाते, ऑक्सफर्डचा पृथ्वी हा खंड, इत्यादी पुस्तकांचाही आधार घेतला.”  मुंबईतील अ. भि. गोरेगावकर शाळेतील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक विभागातील शिक्षक सानिका सावंत आपल्या शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रमाविषयी सांगतायत… (अधिक वाचा)

———————————————————————————————————————————————————————————-

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'मराठी प्रथम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'मराठी प्रथम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. फार छान उपक्रम.सगळ्यांना सहभागी करून घेणं हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.बहुतेक शाळांमध्ये निवडक मुलांनाच अशा उपक्रमांत सहभागी होता येते.

Leave a Reply

Close Menu