मराठी शाळांचे इंग्रजीकरण घातक!


मातृभाषेतून शिक्षण हेच मुलांच्या सर्वांगीण विकासाचे पायाभूत तत्त्व  मानले जाते. ते भाषिक दुरभिमानातून किंवा अस्मितेतून जन्मलेले नाही तर अनुभवातून आणि संशोधनातून सिद्ध झालेले आहे. तरीही पालक आपल्या मुलांच्या भौतिक प्रगतीसाठी इंग्रजीसारख्या परभाषेची माध्यम म्हणून निवड करतात. याचे वैयक्तिक व सामाजिक दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. प्रश्न केवळ मराठीच्या संवर्धनाचा नाही तर मुलांच्या बौद्धिक व भावनिक विकासाचाही आहे. इंग्रजी माध्यमातून शिकले तरच इंग्रजी सुधारते ह्या गैरसमजापोटीही पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठवतात. त्यातून ना मुलांचे इंग्रजी सुधारत ना मराठी. मातृभाषेच्या बरोबरीने इंग्रजीवरही प्रभुत्व संपादन करता येते याचे अनेक दाखले प्रयोगशील मराठी शाळांनी दिलेले आहेत. शासनही पालकांचे इंग्रजी माध्यामासंबंधीचे गैरसमज दूर करण्याऐवजी मराठी शाळांचे इंग्रजीकरण करीत सुटले आहे. मुलांच्या भवितव्यासाठी ते कसे घातक आहे हे सांगताहेत वैशाली विवेक नाडकर्णी... (पुढे वाचा)

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आपल्या महाराष्ट्राची प्रथम भाषा ही लोकभाषा मराठी आहे. या मराठी भाषेने सर्वच क्षेत्रात अनेक नामवंत जन्माला घातले. कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान या व अशा सर्वच क्षेत्रात मराठी माध्यमातून शिक्षण ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , भाषा , पालकत्व

प्रतिक्रिया

  1. NISHA Kajave

      4 वर्षांपूर्वी

    सेमी इंग्रजी माध्यमाची प्रभावी व यशस्वी अंमबजावणी हा यावरील उत्तम पर्याय वाटतो.

  2. Arun Waradpande

      4 वर्षांपूर्वी

    Sorry to write this in English. Nice to read this article. Actually reading/speaking and writing are activities independent of each other. For Instance-Max Mueller was a Sanskrit Scholar but he could not understand spoken Sanscrit as he had never heard it. One has to decide as to the purpose of learning a language. English Language hardly has any English words, they are taken from Greek , Latin Arabic and Sanskrit predominantly. You may like tp read " Sanskrit Origins of English words" on the website: www. nrwaradpande.in Wish you all the best. Arun Warhadpande

  3. प्रसाद पाटील

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतिम लेख.

  4. Aarti B purohit

      6 वर्षांपूर्वी

    Mother tounge education is always good.whether it is any language.it build confidence in human.as well as language of camand is more powerful than English medium students

  5. कविता अजय भागवत

      6 वर्षांपूर्वी

    छान माहिती



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen