"...काही वेळा 'शहाणा' शब्द नकारात्मक अर्थानेही वापरला जातो. एखादा माणूस गरजेपेक्षा जास्त चतुराई दाखवत असेल तर ‘जास्त शहाणपणा दाखवू नकोस’ असं म्हटलं जातं. नेपाळी भाषेप्रमाणे मुंबईया हिंदीमध्ये ‘श्याना – श्याणा’ असं म्हणण्याची पद्धत आहे. गरजेपेक्षा जास्त शहाणपण दाखवणाऱ्याला मराठीत ‘दीडशहाणा’ म्हटलं जातं. याच अर्थाने उर्दू आणि हिंदीमध्ये ‘डेढअक्कल’ म्हणण्याची पद्धत आहे. 'अति शहाणा त्याचा बैल रिकामा' अशी मराठीत म्हणही आहे. स्वतःला शहाणा समजणारा मनुष्य बैलास काम करायला लावले तर त्याला भूक लागून जास्त दाणावैरण आणावी लागेल, या धास्तीने बैल दावणीला नुसता बांधून ठेवतो अन् रिकाम्या बैलासाठी वैरणपाणी करत राहतो. म्हणजे अति शहाण्याचा उद्देश तर साध्य होत नाहीच, तरी त्याला करायचे ते काम करावेच लागते..." भाषा आणि संस्कृती यांचं मनोरम दर्शन घडवणाऱ्या ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ या सदरातील साधना गोरे यांचा - 'ज्ञ' ज्ञानाचा - हा लेख (अधिक वाचा)
---------------------------------------------------------------------
हेही वाचाः-
शब्दांच्या पाऊलखुणा – छडी लागे छमछम! (भाग – दोन)
शब्दांच्या पाऊलखुणा – गोष्ट मातीची! (भाग – एक)
ज्ञ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ugaonkar
6 वर्षांपूर्वीchan
ugaonkar
6 वर्षांपूर्वीkhup mahiti purn
vilasrose
6 वर्षांपूर्वीमाहीतीपूर्ण लेख.कोणत्या भाषेतून मराठीत वेगवेगळे शब्द आले,हे वाचून माहिती मिळाली व मनोरंजनही झाले.
Rdesai
6 वर्षांपूर्वीव्वा ! माहितीपूर्ण लेख.
arvindjadhav
6 वर्षांपूर्वीछान अभ्यासपूर्ण.