भाषाशिक्षणामध्ये प्रथम भाषा, द्वितीय भाषा यांच्या अध्ययन व अध्यापनपद्धतींचा स्वतंत्रपणे विचार केला जातो. त्यांच्या अध्यापनाचे एक शास्त्र आहे. पण त्याचा फारसा विचार न करता पारंपरिक पद्धतीने अमराठी भाषकांना मराठी भाषा आपल्याकडे शिकवली जात होती व आजही शिकवली जाते. एखादी भाषा द्वितीय भाषा म्हणून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीच्या मार्गदर्शनाची, अभ्याससामग्रीची आवश्यकता असते. अमराठी भाषाकांना मराठी शिकवताना प्रथम भाषा म्हणून तयार केलेली अभ्यासाची साधने फारशी उपयोगी पडत नाहीत हे लक्षात येऊनही ती निर्माण करण्यासाठी व्यक्तिगत व संस्थात्मक पातळीवर आजवर फारसे प्रयत्न झालेले नव्हते. मराठीमध्ये अमराठी भाषकांसाठी अनेक पुस्तके आहेत, पण ती श्रेणिबद्ध नव्हती. जागतिक स्तरावर द्वितीय भाषा म्हणून भाषेचे अध्यापन करताना ज्या पद्धतींचा अवलंब केला जातो व ज्या निकषांवर श्रेणिवार अध्ययन सामग्री तयार केली जाते त्यांचा विचार मराठीच्या बाबतीत फारसा झालेला नव्हता. मुंबई विद्यापीठातील जर्मन विभागाच्या प्रमुख डॉ. विभा सुराणा यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी हे न्यून दूर करण्याचा प्रयत्न केला. कसा ते सांगताहेत मराठी अभ्यास केंद्राची प्रतिनिधी ऐश्वर्या धनवडे हिने घेतलेल्या मुलाखतीत... (अधिक वाचा)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शिक्षण , भाषा , व्यक्ती विशेष
प्रतिक्रिया
मराठी भाषाशिक्षणाच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. विभा सुराणा यांचे प्रयत्न
मराठी प्रथम
ऐश्वर्या धनवडे
2019-10-03 10:00:04

वाचण्यासारखे अजून काही ...

पंडित मदनमोहन मालवियजींचे चरित्र - उत्तरार्ध
अज्ञात | 2 दिवसांपूर्वी
महात्माजींचीं सर्वच मतें राष्ट्रीय पक्षाला पसंत नव्हती.
पंडित मदनमोहन मालवियजींचे चरित्र - पूर्वार्ध
अज्ञात | 3 दिवसांपूर्वी
सक्तीशिवाय शिक्षण सार्वत्रिक करणें साधत नाहीं
देवमाणूस - उत्तरार्ध
गोपाळ गंगाधर पोतदार | 2 आठवड्या पूर्वी
हा माणूस अप्रामाणिक असून स्वभावानें विश्वासघातकी आहे
देवमाणूस - पूर्वार्ध
गोपाळ गंगाधर पोतदार | 2 आठवड्या पूर्वी
त्यानें कपडे काढले आणि स्वैपाकघरांत स्टो पेटविण्याचा आवाज ऐकू आला
Rupali Autade
6 वर्षांपूर्वीGood one