वाचन ही व्यक्तीच्या परिपूर्ण विकासातील आवश्यक अशी मूलभूत प्रक्रिया आहे. आपण छंद म्हणून 'वाचनध्यास' घेतला आणि पुस्तकांच्या सहवासात दिवसातला काही वेळ घालवला तर जगणं अधिक आनंददायी होईल. वाचनाच्या संस्कारातूनच विविध क्षेत्रातील संपन्न अशी व्यक्तिमत्त्वे घडली आहेत. युवा पिढीने हा मूल्यसंस्कार जाणीवपूर्वक जोपासायला हवा, असे आवाहन के. एम. सी. महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘वाचन प्रेरणा दिना’ च्या कार्यक्रमात मान्यवरांनी केले.
भारताचे माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा १५ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून सर्वत्र साजरा होतो. मराठी भाषा व साहित्य मंडळ, ग्रंथालय व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व विनम्र अभिवादन करण्यात आले. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या सर्व ग्रंथाचे प्रदर्शन (वाचन कट्टा), सामूहिक वाचन, निबंध स्पर्धा, ‘पुष्पगुच्छ नाही पुस्तक भेट योजना’ या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मान्यवर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जिमखाना चेअरमन व मराठी विभागाचे प्रमुख प्रा. मोहन बल्लाळ यांनी आपल्या प्रास्ताविकातून आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. डी. पी. गायकवाड यांनी भारतीय अवकाश संशोधनातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यां ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Jawale J.N.
6 वर्षांपूर्वीChhan Upkram Sir
cakshay
6 वर्षांपूर्वीsangijosh
6 वर्षांपूर्वीउपक्रम आणि लेख स्फूर्तिदायक