शब्दांच्या पाऊलखुणा – गोष्ट चंद्राची! (भाग – चार)

मानवाने चंद्रावर पाऊल ठेवून बराच काळ लोटला. आता त्याची चंद्रावर वस्ती करण्याची मनीषा आहे. पण तरी त्याला पृथ्वीवरून दिसणारं चंद्राचं रूप मोहवतं. आदिम काळापासून मानवाला चंद्र आणि चांदणं यांची भूरळ पडत आलेली आहे. चांदण्यानं भरलेलं आकाश आणि अमावस्येचा गूढमय काळोख या सृष्टीतील दोन्ही अवस्थांचा माणसाला मोह वाटत राहिला आहे. मानवाला चंद्राच्या वाढणाऱ्या आणि कमी होणाऱ्या ह्या रूपांविषयी औत्सुक्य, नवल वाटत राहिलं आहे. त्यातूनच त्याने निसर्गातील बदणाऱ्या ऋतूंची सांगड चंद्राच्या परिवर्तनीय रूपाशी घातली असणार. मराठी आणि भारतातल्या वेगवेगळ्या कालगणनेत चंद्राच्या या अवस्थांना विशेष महत्त्व आहे. आपले सगळे सण – उत्सव चंद्राच्या याच अवस्थांना  साक्षी मानून साजरे केले जातात. चंद्राच्या ह्या अवस्थांना, त्याच्या रूपांना मानवाने दिलेल्या नावांच्या गोष्टी मजेशीर आहेत.

——————————————————————————-

हेही वाचाः –

शब्दांच्या पाऊलखुणा – ‘ज्ञ’ ज्ञानाचा (भाग – तीन)

शब्दांच्या पाऊलखुणा – छडी लागे छमछम! (भाग – दोन)

मा

चांदण्यांची रात्र म्हणजे पौर्णिमा आणि अजिबात चंद्र नसलेली रात्र ती अमावस्या. पौर्णिमा आणि अमावास्या या दोन शब्दांत समान असणारे अक्षर म्हणजे ‘मा’! संस्कृतमध्ये ‘मा’ ह्या मूळ शब्दाचा (धातू) अर्थ आहे, प्रदीप्त, किरण, कांती, सौंदर्य. हेच चंद्राचेही गुण आहेत. याच अर्थाने वैदिक संसकृतमध्ये चंद्राला ‘मा’ म्हटलं असणार. ह्या ‘मा’ शब्दातूनच पुढे पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णमा, तर चंद्र नसणे म्हणजे अमावास्या अशी नावे पडलेली आहेत. आपल्या मराठी कालगणनेनुसार एका अमावास्येपासून दुसऱ्या अमावास्येपर्यंतच्या काळाला मास (महिना) म्हटलं जात. हा ‘मा’ म्हणजे चंद्राचाच उल्लेख असावा.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. Meenalogale

    लेख आवडला.चंद्र आणि चंदन यांची उत्पत्ती मजेशीर वाटली.

Leave a Reply