माहिती तंत्रज्ञान विषय भाषा विषयाला पर्याय ठेवून आपण एक लाख २५हजार ८२६ विद्यार्थी भाषा विषयापासून गमावले. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जरी इंग्रजी भाषा विषय सोडून इतरही पाच विषयांना माहिती तंत्रज्ञान हा विषय पर्याय दिलेला असला तरी विद्यार्थी जी शाखा निवडतो त्या शाखेतील सर्व वैकल्पिक विषय हे त्याच्या पुढील शिक्षणासाठी महत्त्वाचे असल्याने बहुतांश विद्यार्थी द्वितीय भाषा विषयाला पर्याय म्हणून माहिती तंत्रज्ञान हा विषय घेतात. खरे तर हा विषय आजच्या संगणकीय (digitization) जमान्यात अनिवार्य असणे आवश्यक आहे. त्याची स्वतंत्र अनुदानित विषय म्हणूनच व्यवस्था हवी. दहावी, बारावीच्या घसरलेल्या निकालाविषयी आणि विद्यार्थिसंख्येविषयी सांगताहेत मराठी विषयाचे अनुभवी शिक्षक राजेंद्र शिंदे -
मागील ‘उच्च माध्यमिक स्तरावर भाषाविषयांच्या अभ्यासक्रमांतील असमानता’ या लेखात आपण महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावीच्या मराठी आणि इतर भाषा विषयांच्या अभ्यासक्रमांचा व पर्यायांचा तौलनिक विचार केला होता. प्रस्तुत लेखात शालान्त म्हणजे इयत्ता दहावीच्या भाषाविषयांच्या निकालांचा तौलनिक विचार करायचा आहे. त्यासाठी २०१७ ते २०१९ अशी तीन शैक्षणिक वर्षे विचारात घेतलेली आहेत. सन २०१२-१३ पर्यंत मूल्यमापनाची पद्धत प्रश्नपत्रिकाधारित होती व त्यासाठी स्वाध्यायांसह पाठ्यपुस्तके असत. मात्र २०१५-१६, २०१६-१७ पासून मूल्यमापनपद्धतीत बदल करण्यात आला. आजवरच्या प्रश्नपत्रिकेची जागा ज्ञानरचनावादावर आधारित कृतिपत्रिकेने घेतली. हा बदल विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्हींसाठी आव्हानात्मक हो ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
स्वाती वाघ
6 वर्षांपूर्वीमातृभाषा ही व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाला कारणीभूत असते म्हणून मराठी हा विषय अनिवार्य हवा नैतिकता जेवढी मराठी विषयातून मातृभाषेतून समजावून सांगता येईल तेवढी अन्य विषयांमधून सांगता येत नाही नाहीतर आपण फक्त साक्षर राक्षस निर्माण करू त्यामुळे भारताचा चांगला नागरिक तयार करण्यासाठी मराठी भाषा ही अनिवार्य असणे गरजेचे आहे
कविता अजय भागवत
6 वर्षांपूर्वीमराठी विषय हा अनिवार्य हवा