सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि स्थानिक भाषा यांचा निकटचा संबंध असतो. एसटी असो की मुंबईची बेस्ट सेवा ही आजवर मराठीच्या भाषिक प्रभावाची क्षेत्रे मानली होती. पण खासगीकरणाबरोबर त्यांचेही अमराठीकरण होऊ घातले आहे. मराठी भाषेचा वरचष्मा असलेल्या बेस्ट आणि एसटी आता पुन्हा खासगीकरणाच्या विळख्यात सापडत आहेत. आकर्षक वेतनाची स्वप्ने पाहणारी मराठी भाषिक मंडळी खासगीकरणाच्या माध्यमातून जागतिकीकरणाची आळवणी करत आहेत. त्यामुळेच येथील व्यवहाराची भाषाही बदलत असून मराठीचे संवर्धन आणि संरक्षण या सेवांमध्ये अडचणीचे ठरत आहे. परप्रांतीयांच्या रेट्यात बेस्ट आणि आधुनिकतेच्या विळख्यात एसटीचा कारभार सापडला आहे. स्वाभाविकच बेस्ट आणि एसटी यांची मराठीची धाव खासगीकरणाकडून खासगीकरणाकडे यातच मर्यादित झाली आहे. कशी ते सांगताहेत पत्रकार प्रसाद मोकाशी.
--------------------------------------------------------------------------------------------
आपल्या शहराची असो वा आपल्या राज्याची असो, सार्वजनिक वाहतूक सेवा ही कायम स्थानिकांच्या ताब्यात राहिली आहे. स्थानिकांचे म्हणजेच मराठी भाषिकांचे हे वर्चस्व पूर्वीच्या खासगी वाहतूक सेवेमध्ये नगण्य होते आणि आता या सार्वजनिक वाहतूक सेवेचे पुन्हा खासगीकरण हे स्थानिकांच्या किंबहुना मराठी भाषिकांच्या मुळावर येणार हे नक्की. अर्थात याला विरोध करणे हे केवळ राजकारण असल्यामुळे ते टाळायचे असेल तर सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व एकत्र आले तरच या राज्यातील स्थानिकांना पुन्हा किमान एका ठिकाणी नोकरीची निश्चिती असेल, असे वाट ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .