शाळेत परीक्षेला असणाऱ्या विषयांबरोबरच मुलांचे व्यवहारज्ञानही वाढले पाहिजे. स्वतःचा दैनंदिन खर्च, आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, कुटुंबाचे अंदाजपत्रक, राज्याचे – देशाचे अंदाजपत्रक यांबाबत मुलांनी सजग व्हावे, त्यांच्यात अर्थसाक्षरता निर्माण व्हावी म्हणून पुण्यातील अक्षरनंदन शाळेतील इयत्ता नववीच्या वर्गात मेधा चिकोडे या शिक्षिकेने राबवलेला हा उपक्रम -
---------------------------------------------------------------------------------------------------
इ. ९वीला 'अर्थशास्त्र' या विषयात 'कुटुंबाचे अंदाजपत्रक' हा धडा आहे. अंदाजपत्रक म्हणजे काय? ते का तयार करायचे असते? त्याचे फायदे काय? हे मुलांना वेगवेगळी उदाहरणे देऊन समजावून दिले जाते. कौटुंबिक अंदाजपत्रक हे कुटुंबाचे महिन्याचे अंदाजे एकूण उत्पन्न व एकूण खर्च याचे नियोजनपत्रक असते. थोडक्यात उत्पन्न व खर्च यांचा ताळेबंद म्हणजे अंदाजपत्रक. हा ताळेबंद मुलांच्या पटकन लक्षात यावा यासाठी मुलांना स्नेहसंमेलन, दुकानजत्रा यांच्यातील त्यांच्या अनुभवांची आठवण होतेच. स्नेहसंमेलन, दुकानजत्रा यांसाठी संस्था शाळेला काही रक्कम खर्चासाठी देते. स्नेहसंमेलनासाठी कोणकोणते खर्च असतात, हे मुलांना विचारले जाते. ते सर्व खर्च फळ्यावर लिहिले जातात. संस्थेकडून मिळणारी रक्कमही (अंदाजे) फळ्यावर लिहिली जाते व ताळेबंद तयार केला जातो. स्नेहसंमेलनाचे अंदाजपत्रक हे वर्षातून एकदा तयार केले जाते. पुढच्या वर्षी हे अंदाजपत्रक तयार करताना काही खर्च तेच असतील; परंतु त्यांच्या रकमेत वाढ झालेली दिसून येईल. काही वस्तूंच् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Meenalogale
6 वर्षांपूर्वीस्तुत्य उपक्रम.सगळ्या शाळांमध्ये असे उपक्रम राबवायला हवेत.