‘प्रत्येक सामाजिक वर्गाला आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याची फार इच्छा असते. त्यामुळे स्वतःची भाषा, कपडे हे त्याप्रमाणे निवडले जातात, तसे ते स्वतःच्या शिक्षण संस्थाही निवडतात. माझी मुलगी दापोलीच्या शाळेतून मुंबईतील सेंट झेवियर्समध्ये गेली तर तिला तिथे फक्त मराठी हे डाऊन मार्केट नव्हतं तर एसएससी बोर्ड – स्टेट बोर्ड हेही डाऊन मार्केट होतं. म्हणजे आता सीबीएससी, आयसीएससी, आयबी, आयजीएससी अशा बोर्डांचं फॅड आहे. तुम्ही सीबीएससीमध्ये मुलांना घातलंत की तुमच्यापेक्षा वेगळं दाखवायचं म्हणून ते त्यांच्या मुलांना आयसीएससीमध्ये घालणार. तुम्ही जेव्हा आयसीएससीपर्यंत पोहचणार तेव्हा ते आयबीपर्यंत पोहचणार असं करत दहा – बारा वर्षांत अजून एक बोर्ड निघणार. मुळात ही जी प्रेरणा आहे, खालच्या वर्गाने वरच्याला गाठत राहण्याचा प्रयत्न करणं, आपण हे गाठलं तर आपल्याला त्यांच्यासारखं बनता येईल आणि वरच्या वर्गाने सतत असं म्हणत राहणं की आम्हाला यांच्यापेक्षा वेगळे मार्कर्स् हवेत; आपलं संपूर्ण शिक्षण हे अशा गर्तेत अडकलेलं आहे. याच्या पलीकडे जाऊन कुणीही मुलाला काय हवंय याचा विचार करून शिक्षणाचा निर्णय घेत नाहीत.’ समाजाच्या भाषाव्यवस्थेच्या मुळाशी असणाऱ्या आजच्या शिक्षणव्यवस्थेविषयी सांगतायत अंनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर
------------------------------------------------------------------------------------------------------
मातृभाषेतून शिक्षण याबद्दलची माझी कारणे ही कालपरत्वे बदलत गेलेली आहेत. माझी मोठी मुलगी आता अठरा वर्षांची आहे आणि मुलगा दहा वर्षां ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Rdesai
6 वर्षांपूर्वीलेख आवडला.
svsandhya
6 वर्षांपूर्वीस्वतःची मतं प्रांजळपणे आणि स्पष्ट मांडणारा लेख.
dbgaikwad
6 वर्षांपूर्वीमुक्ता दाभोळकरचा, निर्णय मराठी शाळेत मुलंना घालण्याचा मनापासून आवडला.