माध्यमबदल - एक चिंतन


“हुशारीच्या सर्वसाधारण व्याख्येत चपखल बसणाऱ्या माझ्या दोन्ही मुलांचे शाळेतले टक्के उत्तम होते, पण मग एक घटना घडली, जिने मला ‘शाळा’ या विषयावर पुनर्विचार करायला भाग पाडलं. इतर सर्वांसाठी  ती सर्वसाधारण घटना होती, पण मी मात्र तिचं मूल्यमापन वेगळ्या पद्धतीने केलं. माझा मोठा मुलगा वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून शिवाजी महाराजांच्या गोष्टी आवडीने ऐकत होता. तो जसा मोठा होऊ लागला तसा शाळेतील गोष्टी सांगायला लागला. चौथीत असताना शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासाला होता. परीक्षा जवळ आल्यामुळे नेहमीप्रमाणे रिव्हिजन घ्यायला बसले आणि एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, ती म्हणजे त्याला पावनखिंडीची गोष्ट तर तोंडपाठ होती पण उत्तर विचारलं तर आठवून सांगतोय! पाठांतर करतोय... का? तर उत्तर इंग्लिशमधून द्यायचं होतं. लगेच मनात गणित मांडलं गेलं की, एका येत असलेल्या उत्तरासाठी जास्तीची दहा ते पंधरा मिनिटे... अजून मोठे झाल्यावर अजून अवघड अभ्यास मग ही मुले विषय समजून कधी घेणार?” इंग्रजी माध्यमातील घोकंपट्टीचे शिक्षण पाहून अस्वस्थ झालेल्या एक सजग पालक – मुग्धा भिडे आपल्या मुलांच्या माध्यमबदलाची गोष्ट सांगणारा हा लेख - 

-----------------------------------------------------------------

मुलाची शाळा हा प्रत्येक आईचा अतिशय जिव्हळ्याचा विषय असतो कारण त्याचं भविष्य तिथे घडणार असतं. शाळा चांगली असेल तरच आपलं पिल्लू शैक्षणिक प्रगती करू शकेल असा एक निराळाच विश्वास पालकांना असतो आणि मग आधी डोळ्यांसमोर उभी राहते ती घराजवळची एखादी इंग्रजी माध्यमाची शाळा. म्हणजेच चांगलं सराउंडिंग, चांगले ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Rdesai

      5 वर्षांपूर्वी

    खरच सजग पालक असणे आज गरजेचे आहे.

  2. Shyam

      5 वर्षांपूर्वी

    याविषयी अनेक वेळा अनेक लोक बोलले आहेत . सरकारी पातळीवरच हा निर्णय व्हायला हवा .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen