या पालक संमेलनाचं एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे महाराष्ट्राच्या विविध प्रयोगशील शाळांची दालने! महाराष्ट्रातील पहिली प्रयोगशील शाळा – कोल्हापूरची सृजन आनंद, नाशिकची आनंद निकेतन, पुण्याची अक्षरनंदन, लर्निंग होम (ग्राममंगल), शिरूरची जीवन विद्या मंदिर, फलटणची मॅक्सिन मावशींची कमला निंबकर बालभवन, बेळगाव - खानापूरच्या जिल्हापरिषदेच्या शाळा, मुंबईची अ. भि. गोरेगावकर स्कूल, पार्ले टिळक विद्यालय या शाळांतील कितीतरी प्रयोग इथे एका छताखाली पाहण्याची संधी असते. शिवाय नॅशनल पब्लिक ट्रस्ट, साने गुरुजी स्मारक, साहित्य अकादमी, राज्य मराठी विकास संस्था, ग्रंथाली, ज्योत्सना इ. प्रकाशक आणि इतर बालसाहित्य आणि शालोपयोगी वस्तूंचे विक्रेते यांची ग्रंथदालने असतात. मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तकाळीच (पुस्तकांची दिवाळी) म्हणायला हवी. बरेच विद्यार्थी आणि पालक एवढ्या संख्येने पुस्तके आणि शैक्षणिक साहित्यातील प्रयोग पहिल्यांदाच पाहत असतात. आधी नुसतं पुस्तकं न्याहाळणं, आवडलेल्या एखाद्या पुस्तकाला स्पर्श केला तर पुस्तकांच्या मागे बसलेले काका काही म्हणतील का अशी चेहऱ्यावर उमटणारी भीती, मग काकांनी हसून प्रतिसाद दिल्यावर – निव्वळ मनसोक्त पुस्तक चाळण्यात हरखून गेलेले भाव, किंवा सोबत आई/बाबा असतील तर त्यांच्या खिशाला परवडले तर खरेदी केलेले पुस्तक. तेव्हा त्या निरागस चेहऱ्यावर फुललेला आनंद मला आमच्या घरी अभ्यासाव्यतिरिक्त पहिले पुस्तक आणले गेले तेव्हा झालेल्या आनंदासारखाच वाटतो. (मी नववीत असताना माझ्या लहान भावाने शांतिवनात शिबिरासाठी गेल्यावर २५ रुपयांचं ‘श्यामची आई’ पुस्तक आणलं होतं.) ही वाचनसंस्कृती टिकवायची, वाढवायची तर मराठी शाळा हव्यातच ना!
< ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Rdesai
6 वर्षांपूर्वीखूप सुंदर उपक्रम .
साधना गोरे
6 वर्षांपूर्वीनमस्कार, मराठी माध्यमाच्या शाळांतील पालकांची ही भीती घालवण्यासाठीच आपण पालक संमेलनाचा उपक्रम करतो. अर्थात, तेवढंच पुरेसं नाही याची आम्हालाही जाणीव आहे.
साधना गोरे
6 वर्षांपूर्वीआपला संपर्क क्रमांक कळवाल? म्हणजे आपल्या या उपक्रमाविषयी सविस्तर जाणून घेता येईल.
विकी नन्नावरे
6 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख ...
ज्ञानेश्वर महादू सातपुते
6 वर्षांपूर्वीबहुतेक मराठी माध्यमात शिकलेल्या पालकांच्या मनात इंग्रजी बद्दल जी भिती आहे ती भीती आपल्या पाल्यानां वाटू नये म्हणून बहुतेक पालक मुलांना इंग्रजी माध्यमात घालतात, म्हणून मीही त्या भेदरलेल्या पालकांतील एक घटक आहे, म्हणून वाटतं प्रथम पालकांच्या मनातील इंग्रजी ची भीती घालवली की ते आपोआप मुलांना स्वतः शिकलेल्या मराठी माध्यमात घालतील ?
Sunil ishware
6 वर्षांपूर्वीमी सुनील ईश्वरे, मराठी व ईंग्रजी माध्यमातून माध्यमिक स्तरावरील विज्ञान शब्दकोश लिहितो.