पूर्वी मातृभाषा मराठीतून शिक्षण हा महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचा मुख्य प्रवाह होता. अलिखित नियम होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. घड्याळाचे काटे उलटे फिरू लागले आहेत. गोवोगावी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे. सरकारलाही वाटू लागले आहे की इंग्रजी माध्यमाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. आपल्या पाल्याला कोणत्या माध्यमाच्या शाळेत पाठवायचे याचा निर्णय खरे तर पालकच घेत असतात. पण पालकांना कुणी प्रांजळपणे मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगायचा प्रयत्न केला तरीही ते त्यांच्या पचनी पडत नाही असा अनुभव आहे. इंग्रजी माध्यमातून शिकल्याशिवाय आपल्या मुलाला भवितव्य नाही, अशी एक ठाम समजूत समाजाने करून घेतली आहे. आपण स्पर्धेच्या जगात मागे पडू ह्या भीतीस्तव लोक ह्या समजुतीच्या बाहेर यायचा विचार सुद्धा करत नाहीत. मात्र आपल्या या अंधश्रद्धेमुळे बालकांची कुतरओढ होते हे आपण लक्षात घेत नाही. परक्या भाषेतून विषय ग्रहण करणे मुळीच सोपे नसते. असा वेडेपणा जगात इतरत्र क्वचितच आढळतो. मूलभूत संकल्पना समजण्याकरिता मातृभाषेशिवाय कोणतेही माध्यम उपयोगी नाही असे जगभरचे तज्ज्ञ सांगतात. पण आपल्या समाजात त्यांचे कोणी ऐकायला तयार नाही. समाजाची ही मानसिकता कधी बदलणार? आपला अनुभव सांगताहेत मातृभाषेतील शिक्षणाबाबत आग्रही असलेलले गणिताचे नामवंत शिक्षक आनंदकुमार गोरे.
------------------------------------------------------------------------------------------------------
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
मातृभाषेतून शिकायचे की इंग्रजीतून?
मराठी प्रथम
आनंदकुमार गोरे
2019-12-23 22:33:31

वाचण्यासारखे अजून काही ...

लता मंगेशकर - उत्तरार्ध
शांताराम खळे | 5 दिवसांपूर्वी
'एकाच रागात गाण्याचा कटाक्ष दिसत नाहीं तुम्हा मंडळींचा लताबाई !'
लता मंगेशकर - पूर्वार्ध
शांताराम खळे | 2 आठवड्या पूर्वी
माझे नेहमीचे वाद्यवादक असल्याविना मी कधीं गात नाहीं
कथा : आयुष्याचा हिशोब
व. पु. काळे | 2 आठवड्या पूर्वी
एक वृद्ध माणूस दुसऱ्या वृद्धाला आधार देत होता. दोन वेलींनी एकमेकांच्या आधाराने उंच होऊं असं म्हणण्यासारखंच होतं ते!
म. गांधी समाजवादी होते काय ?
राम जोशी | 2 आठवड्या पूर्वी
सत्याग्रही तत्त्वज्ञान आदर्शवादी आहे तर समाजवादी तत्त्वज्ञान वास्तववादी आहे.
nilambari
6 वर्षांपूर्वीखूपच छान आहे.
छाया चंद्रकांत गाडे
6 वर्षांपूर्वीखरं आहे .इंग्रजी बाबत अनेक गैरसमज आहेत वते समजून घ्यायचेच नाहीत असे ठाम ठरवण्यात आले आहे. इंग्रजीला विरोध म्हणजे प्रगतीला विरोध.काळाबरोबर न चालणे. असेच समजले जाते.पालक मुलंना मराठी शाळेत घालत नाहीत .असे सरकार मानते. पण गल्ली बोळात इंग्रजी शाळांना परवानगी देऊन मराठी शाळांची कोंडी केली असे शिक्षक मानतात.मातृभाषेचे फायदे व मुलांचे बाल्य कोणीच समजून घेत नाहीत.
़अरुण दत्तात्रय पळणीटकर
6 वर्षांपूर्वीमातृभाषाच पाल्याला परिसरातील, समान संस्कृतीतील अनुभव समृद्ध ज्ञानाचे नैसर्गिकरीत्या आकलन करून देऊ शकते।
ज्योती लोणकर वाघमारे
6 वर्षांपूर्वीकोणताही विषय आपल्या मातृभाषेतूनच चांगला समजूशकतो या मताशी मी सहमत आहे. अंक वाचला. आवडला....