दि. १४ डिसेंबर २०१९ रोजी जुने विवा कॉलेज, विरार (प.) येथे पार पडलेल्या नवव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. प्रज्ञा दया पवार यांचे भाषण.
-----------------------------------------------------------------------------------------
नमस्कार !ऐतिहासिक आणि समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या विरार नगरीत आयोजित केलेल्या नवव्या शिक्षक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देऊन माझा सन्मान केल्याबद्दल सतत संघर्षाच्या वाटेने चालणारे साथी माननीय आमदार कपिल पाटील यांचे तसेच शिक्षक भारतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि माझ्या कवयित्री मैत्रिणीचे – नीरजाचे मनापासून आभार मानते. विचारमंचावर उपस्थित असलेले या संमेलनाचे उद्घाटक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व प्रदीर्घ काळापासूनचे माझे ज्येष्ठ सुहृद असलेले आदरणीय फादर फ्रान्सिस दिब्रिटो, स्वागताध्यक्ष सन्माननीय क्षितिज ठाकूर, समारोपाच्या सत्राचे अध्यक्षस्थान भूषविणारे सन्माननीय खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष व माजी संमेलनाध्यक्ष सन्माननीय श्री. जयवंत पाटील आणि इथे जमलेले आपण सर्व शिक्षकगण तसेच वसई-विरारवासीय साहित्यप्रेमी नागरिक, बंधू-भगिनींनो,
एक व्यक्तिगत पण गमतीशीर बाब सांगून माझ्या आजच्या भाषणाची सुरुवात करणार आहे. माझ्या लेखकीय कारकीर्दीमध्ये ज्या पहिल्या साहित्य संमेलनाची मी अध्यक्ष झाले, ते होतं विद्यार्थी साहित्य संमेलन. महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई आणि रुईया महाविद्यालय, माटुंगा यांनी संयुक्तपणे आयोजित केलेलं. ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .