fbpx

निस्त्याकाच्या चवीप्रमाणे बदलते मालवणी!

“मालवणी समाजात विविध जातीमध्ये जेवणाची चव वेगवेगळी असलेली दिसते. ती त्यातील निस्त्याकामुळे (आमटी) कारण त्यातील मसाल्याचा वापर आणि बनवण्याची पद्धत भिन्न भिन्न असल्यामुळे ती जातींप्रमाणे वेगळी असते. तशी ह्या भाषेतील अनेक शब्दरूपे आणि त्यांची उच्चाररूपे जातिसमूहांप्रमाणे बदलताना दिसतात. ब्राम्हणसमाज, सारस्वतसमाज, कोळीसमाज, कुळवाडी आणि दलितसमाज यांच्यातील मालवणी उच्चारात काहीशी भिन्नता असलेली जाणवते. जाताSत, जाताहाSत, जातासाSत, जातांत, जातांSव असे उच्चारभेद एकाच शब्दरूपात होताना दिसतात. कोकणातील मुस्लिम समाजात तर मालवणी आणि हिंदीचे एक मिश्ररूप पाहावयास मिळते. मालवणी प्रदेशातून गेलेल्या आणि दीर्घकाळ मुंबईत वास्तव्य करून राहिलेल्या मालवणी माणसांची बोली अशीच मिश्ररूपात पाहावयास मिळते. मालवणी बोलीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द पाहावयास मिळतात.” मालवणी बोलीच्या वैशिष्ट्यांविषयी सांगतायत मराठीचे प्राध्यापक डॉ. गोविंद काजरेकर 

——————————————————————————————-

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'मराठी प्रथम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'मराठी प्रथम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 7 Comments

 1. नुस्त्याचे म्हणजे माशांची आमटी हे खरे आहे. पण सिंधुदूर्गात मालवणीत आमटीला सांबारा किंवा निस्त्याक असे म्हटले जाते

  1. धन्यवाद!लेख उत्तमच आहे.शब्दार्थात चूक दाखवण्याचा हेतू मुळीच नव्हता.खरंच,भाषा ही इतकी प्रामाणिक,लवचिक आणि लाजाळू असते की ज्या मातीत ती मिसळते,त्या मातीच्या गंधात ती समरस होते.भाषेच्या या देवाणघेवाणीमुळेच शब्दांचं भांडार समृद्ध आणि वैभवसंपन्न होतं.नव्या लेखाची वाट बघतोय.—अरुण दत्तू बांदेकर

 2. या लेखात एके ठिकाणी ‘निस्त्याकामुळे(आमटी)’असा उल्लेख आहे.वास्तविक ‘निस्त्याक’चा अर्थ ‘आमटी’नसून मासळीच्या (माशाच्या) आमटीला ‘निस्त्याक’म्हणतात.आमच्या कारवार गावाकडे घरोघरी हाच शब्द वापरतात.
  —अरुण दत्तू बांदेकर

 3. मस्तच.. मीही मालवणी असल्याने परंतु शहरात मोठा झाल्याने गावची नाळ तुटली पण पूर्ण नाही कारण गणपती मे च्या सुट्टीत जाणे येणे होतच असते..काही नवीन शब्द शिकायला मिळाले. मला वैयक्तिक प्रमाण भाषेपेक्षा बोली भाषा च जास्त जवळची वाटते.. धन्यवाद..

 4. छान

 5. मी सभासद आहे. तरी मला लेख वाचायला का मिळत नाही?

  1. लॉगिन केलंत की वाचता येईल.

Leave a Reply

Close Menu