fbpx

मराठी भाषेतील ऑनलाईन माहितीस्त्रोत – भाग दोन

मुद्रणयुगातून ऑनलाईन किंवा डिजिटल युगात आपण प्रवेश केला आहे. आपल्या अवतीभवतीच्या जगाची आणि गतकाळाची माहिती आपल्या हातातील भ्रममध्वनीवरून आपण कधीपासून मिळवायला सुरुवात केली हे आपणास आठवू नये इतके आपण माहितीच्या ऑनलाईन स्रोतांना सरावलो आहोत. पण ही माहिती बहुधा इंग्रजीत असते. कारण ती इंग्रजीसारख्या जगभर पसरलेल्या भाषेतून जितकी उपलब्ध आहे तितकी प्रादेशिक भाषांतून आज तरी नाही. प्रादेशिक भाषा जितक्या तंत्रस्नेही होत जातील तितक्या त्या भाषा समृद्ध होत जातील आणि इंग्रजीशी स्पर्धा करू लागतील. मराठीमध्ये त्याची सुरुवात झाली असून सर्वसामान्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी मराठीतील माहितीचे विविध स्रोत आपणास पाहावयास मिळतात. माहिती व ज्ञान यांची मुद्रित साधने अद्यापही आपले महत्त्व राखून असली तरी येणारा काळ हा ऑनलाईन माहिती व ज्ञानाचा असणार आहे. ह्या लेखमालेतून मराठी भाषेतील निवडक ऑनलाईन माहितीच्या स्रोतांचा परिचय आपणास करून देणार आहेत – परितोष पवार. ते मुलुंड, मुंबई येथील वझे – केळकर महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत असून ग्रंथालयशास्त्र व ग्रंथव्यवहार यांचे अभ्यासक आहेत.

—————————————————————————————-

‘मराठी भाषेतील ऑनलाईन माहितीस्रोत’ सदरातील या भागात आपण आज भाषा संचालनालयाच्या परिभाषा कोशांबद्दल माहिती करून घेणार आहोत. हे परिभाषा कोश ‘भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई’ यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संकेतस्थळावर जाण्यासाठी पुढील दुव्याचा वापर करता येतो – https://directorate.marathi.gov.in/

शब्दांचा शोध घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पर्याय एक – संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर ‘अनुवाद’ या शीर्षकाखाली ‘परिभाषा कोश’ हा दुवा उपलब्ध आहे. त्याचा वापर करून महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागनिर्मित कोशाच्या मुख्य पृष्ठावर जाता येते. या पृष्ठावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर केलेली शब्दकोशनिहाय ‘वर्णानुक्रमिक अनुक्रमणिका’ उपलब्ध आहे. या शब्दक्रमणिकेचा वापर करून आपण शोध घेत असलेला शब्द कोणत्या परिभाषा कोशात उपलब्ध आहे त्याची माहिती मिळते. याच पृष्ठावर शब्दांचा शोध घेण्यासाठी text box ची सोय करण्यात आली आहे. इथून मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांतून शब्दांचा शोध घेता येतो. परिणामांच्या माध्यमातून आपण शोधलेल्या शब्दासंबंधी विविध प्रकारची माहिती मिळते. मराठीतून शब्द शोध घेतल्यास त्या शब्दाचा इंग्रजी पारिभाषिक शब्द किंवा अर्थ, इंग्रजीतून शब्द शोधल्यास त्या शब्दाचा मराठी पारिभाषिक शब्द किंवा अर्थ दाखवला जातो. या बरोबरच शोध शब्दाशी संबंधित इतर पारिभाषिक शब्द व त्यांचे अर्थही दाखवले जातात. सदर पारिभाषिक शब्द कोणत्या परिभाषा कोशातून घेण्यात आले आहेत त्याचीही माहिती दिली जाते.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'मराठी प्रथम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'मराठी प्रथम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. छान

  2. लेख माहितीपूर्ण आहे. मराठी भाषा आणि समाज हा तंत्रस्नेही होईल तशी यात प्रगती दिसेल.

Leave a Reply

Close Menu