मराठी शाळा नेमक्या इथेच चुकतात…!


मराठी शाळांचं वैभव पुन्हा आणायचं म्हणत मराठी शाळा इंग्रजी शाळांचा मापदंड समोर ठेवून त्यांनी केलेल्या चुकांचं अनुकरण तर करत नाहीत ना? मराठी शाळेत कालबाह्य गोष्टी जतन करण्याचे पायंडे तर पाडले जात नाहीत ना? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या बाबतीत मराठी शाळेचे संस्थाचालक, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी यांना आत्मपरीक्षणास प्रवृत्त करणारा, परखड भाष्य करणारा पत्रकार नमिता धुरी यांचा हा लेख -

-------------------------------------------------------------------------------

मी सुरुवातीलाच हे स्पष्ट करते की,  लेखातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक मराठी शाळेला लागू होईलच असे नाही. काही मराठी शाळा स्वतःमध्ये खरंच कौतुकास्पदरित्या बदल घडवतात. पण या शाळा अपवादा‍त्मक असतात. जास्तीत जास्त मराठी शाळा अजूनही बदलाच्या प्रक्रियेपासून अंतर ठेवूनच आहेत. अशा शाळांसाठी हा लेख आहे. इतरांच्या भावना दुखावण्याचे कारण नाही.

एखादी गोष्ट बदलायची असेल, तर सर्वात आधी ती स्वीकारावी लागते. एखादी गोष्ट आपण जेवढी नाकारू किंवा लपवण्याचा प्रयत्न करू तेवढी ती अधिक अडचणीची ठरत जाते. मराठी शाळांचे सर्व पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी यांनी सध्या हेच समजून घेणं गरजेचं आहे. मराठी शाळांचा दर्जा घसरला किंवा काळानुसार तो वाढलाच नाही, हे सत्य आपण स्वीकारायला हवं. बदलत्या काळाच्या गरजा न कळणे हे मराठी शाळांच्या आजच्या अवस्थेचे प्रमुख कारण आहे ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण

प्रतिक्रिया

  1. साधना गोरे

      5 वर्षांपूर्वी

    सुप्रियाताई, आम्हीही तेच म्हणतोय, हसतखेळत शिक्षण झालं पाहिजे. अन् ते मातृभाषेतूनच शक्य आहे असं जगातल्या वसाहतीकरण न झालेल्या सर्व देशांना वाटतं.

  2. सुप्रिया

      5 वर्षांपूर्वी

    खूप अतिरेक आहे तुमच्या लेखात मराठी माध्यमाच्या बाबतीत आहेत काही मुद्दे पटले पण सर्व नाही तुलना करणे योग्य नाही कुणाला कोणत्या माध्यमातून शिक्षण घ्यायचे ज्याने त्याने ठरवावे. सहज हसत खेळत शिक्षण आणि संस्कार हे महत्वाचे आहे. धन्यवाद

  3. मुग्धा

      5 वर्षांपूर्वी

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि वास्तवाचं भान आणणारा लेख!

  4.   5 वर्षांपूर्वी

    उत्कृष्ट वैचारिक लेख!

  5. Rdesai

      5 वर्षांपूर्वी

    योग्य मत



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen