fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

शिवराय आणि बालमावळे

“शिवराय व विद्यार्थ्यांच्या पत्रसंवादानं एक नक्की झालं, मुलांच्या मनातली स्वराज्यविषयक जाणिवांची चर्चा सुरू झाली. मुलांना, आपला शत्रू आता बदलला आहे आणि त्यांच्याविरुद्ध लढण्याचे मार्गही बदलले आहेत, हे उमजलं. दैनंदिनी लिहिताना दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत शिरून विचार करायला मुलांनी सुरुवात केली. इतिहासाला दोन बाजू असतात आणि दुसरी बाजूही महत्त्वाची व दखलयोग्य असू शकते, या दिशेनं मुलं विचार करू लागली.” पाठ्यपुस्तकातील शिवाजीच्या निमित्ताने मुलांना वर्तमानातील अव्यवस्थेविषयी विचार करायला प्रवृत्त करणारा नाशिक येथील आनंद निकेतन शाळेतल्या आपल्या उपक्रमाविषयी सांगतायत दीपा पळशीकर –

———————————————————————–

इयत्ता चौथीला शिवाजीमहाराजांचं जीवनकार्य हा इतिहासाचा विषय आहे. स्वराज्यस्थापनेची ओळख यापलीकडे जाऊन मलांना स्वातंत्र्याची प्रेरणा समजावणं, हा इतिहासाच्या शिक्षकापुढचा जटील प्रश्न असतो. इतिहास शिकवताना अनेकदा शिक्षकच भावनेच्या आहारी जाण्याचा धोका असतो. तसं न करावं, तर इतिहास केवळ सनावळ्यांची जंत्री बनून जातो व मुलांना त्यात रस वाटेनासा होतो. पाठ्यपुस्तकाची भाषाही चौथीच्या मुलांना समजेल अशी नाही. मुलांच्या भावविश्वात नसलेले दाखले देणारी अलंकारिक भाषा या पुस्तकात आहे. भावनात्मकता टाळून त्याचा वर्तमानाशी संबंध जोडून मुलांना त्यात रस निर्माण करण्यासाठी शिक्षकाला नेहमीच सज्ज राहावं लागतं.

शिवरायांच्या मृत्यूनंतरच्या पाठांत शिवरायांची युद्धनीती, राजनीता यांची चर्चा आहे. हे पाठ मुलांना खूप कंटाळवाणे वाटतात. कारण शिवरायांच्या जीवनातलं नाट्य त्यात नसतं. या पाठांत एक वाक्य असं आहे की, ‘जवाहिरा जसे मोती पारखून घेतो, त्याचप्रमाणे एकेक गुण पारखून शिवरायांनी माणसं निवडली.’ त्यावरून वर्गात ‘चर्चा सुरू झाली, की शिवरायांना कोणते गुण असलेली माणसं हवी असतील? यावर विचार करून मुलांनी शौर्य, प्रामाणिकपणा, प्रसंगावधान, स्वाभिमान, निर्णयक्षमता अशा १६ गुणांची यादी केली. मग तुम्हाला शिवरायांच्या सैन्यात सामील व्हायचे असेल तर आणि यादीतले गुण तुमच्यात असतील तर तुम्ही शिवरायांकडे कामासाठी अर्ज करणार का, असं मुलांना विचारलं, तेव्हा सर्वच मुलांनी उत्साहानं व हिरिरीनं अर्ज लिहिले. त्यातली बालसुलभता व मोकळेपणा मोहून टाकणारा आहे.

साक्षीनं लिहिलं की, ‘तुम्ही काढलेल्या कंपनीत आपण काम करण्यास तयार आहोत!’ तर ‘मी तुमचं नाव फार ऐकून आहे. मी फितुरी करणार नाही; पण शत्रूला फितूर करून घेईन’, असंही धनश्रीनं लिहिलं! या पत्राला अनपेक्षितपणे शिवाजीमहाराजांचं उत्तर आलं!

‘आनंदनिकेतन ‘मधल्या माझ्या मावळ्यांनो,

तुमची पत्रं मिळाली. स्वराज्याच्या कार्यात तुम्हीही सामील होऊ इच्छित आहात, हे वाचून आनंद वाटला. शौर्य, आत्मविश्वास, एकनिष्ठता यात तुम्ही कधीच कमी पडणार नाही, याची मला खात्री आहे. मला तुमचा सच्चेपणा खूपच आवडला. रोहिणीनं लिहिलंय, ‘मला थोडंसंच युद्ध करता येतं; पण मी अमात्य म्हणून जमाखर्च ठेवण्याचं काम करेन.’ स्वराज्यात सर्वच गुणांची गरज आहे आणि सर्वच कामं सारख्याच महत्त्वाची आहेत. तुम्ही मुलं स्वराज्यासाठी जे काम करता, त्याकडे माझं लक्ष असतं. नाशकात पुस्तकप्रदर्शनाच्या आयोजकांनी काम झाल्यावर सर्व कचरा तसाच टाकून दिला. हे पाहून मला फार वाईट वाटलं; पण मग ‘आनंदनिकेतन’ची सातवीची मुलं व काही जागरूक तरुण-तरुणींनी मिळून आपल्या परीनं कचरा आवरला, हे पाहून मला फार आनंद झाला. शिवजयंतीला वा नंतर काही लोक मिरवणुका काढतील; पण त्यापेक्षा स्वच्छता करणारी मुलंच माझे खरे मावळे म्हणून मला प्रिय आहेत. कारण आता आपली लढाई आपल्यातल्या दुर्गुणांविरुद्धच आहे. त्यासाठीही तेवढंच शौर्य लागणार आहे, जेवढं लढाईला लागत होतं. तुम्हा सर्वांना मी माझ्या सैन्यात घेतलंय; पण आता केवळ मारामारी करायचं काम करून चालणार नाही. हा देश सुंदर बनवायचा आहे. गरिबांना शिक्षण मिळवून द्यायचं आहे, आपल्यापेक्षा जो दुबळा असेल त्याला मदत करायची आहे.

या कामात तुम्ही मदत करणार ना?

यापुढेही मला जरूर पत्र पाठवत राहा. माझंही तुमच्याकडे लक्ष आहेच.

तुमचा,

शिवाजी महाराज, रायगड ‘

हे उत्तर शाळेत आल्यावर एकच खळबळ उडाली. मुलांना खूप आनंदही वाटला आणि अविश्वासही! ताईंनीची आपल्याला शिवराय बनून उत्तर लिहिलंयं, असं मुलांना वाटत होतं. मुग्धा तर म्हणालीच, “ताई, आम्ही आता

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 4 Comments

  1. Vilakshan stutya upakram. Shivrayanche mawale honyasathi, laganari sarva kaushalye mulani atmasat keli tar Shivrayanche Swarajya-Surajya banavinyache swapna sakar hoil.
    Aajachya ghadla ya sadgunanchi vanava asalyane tya gunanche bijaropan karane atishay jaruri ahe. Ya upakramadware he dheya purna hoil.
    Apalya Rajya var ani parayayane Deshachya kshitijavar mangalyacha Suryoday hovo hich prarthana.

  2. दिपा ताई भन्नाट कल्पना!!मुल्यवर्धन करणारा मौलिक लेख.

  3. दिपाताई उत्कृष्ट संकल्पना.! मुल्यवर्धन करणारा मौल्यवान लेख!!

  4. Khupach sundar kalpana

Leave a Reply

Close Menu