"वर्तमानपत्रांच्या साप्ताहिक पुरवण्या ते वार्षिक दिवाळी अंक अशा व्यापक पटलावर बालकांसाठीची नियतकालिके आज कार्यरत आहेत. गरज आहे ती त्यांच्याकडे स्वागतशील वृत्तीने बघण्याची व त्यांना आपल्या कुटुंबात अविभाज्य स्थान देण्याची!" बालकांच्या नियतकालिकांचा इतिहास आणि सद्यःस्थिती स्पष्ट करणारा प्राध्यापक आणि बालसाहित्याच्या अभ्यासक विद्या सुर्वे - बोरसे यांचा हा लेख
--------------------------------------------------------------------------------------------
मराठी वाङ्मयीन नियतकालिकांचे जग कल्पक आणि देखणे बनवण्यात बालकांसाठीच्या नियतकालिकांचे स्वत:चे एक योगदान आहे. मराठी मासिकांचा प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या पंचवीस वर्षांतच बालकांसाठीच्या नियतकालिकांनी स्वतंत्रपणे आपला सुभा निर्माण केला.
इ.स. १८६१ साली प्रकाशित होऊ लागलेल्या ‘सत्यदीपिका’ या मासिकाचा उल्लेख कालानुक्रमे मराठीतील मुलांचे ‘पहिले मासिक’ असा करता येईल. सद्धर्माच्या प्रसारप्रचाराचा भाग म्हणून हे मासिक चालवण्यात येई. तथापि मुलांसाठीच्या या मासिकातील लेखांची भाषा मात्र मुलांच्या बुद्धीला पेलवणारी नव्हती, असे अभिप्राय अभ्यासकांनी नोंदवले आहेत.
१८६१ सालीच ‘पुणे पाठशालापत्रक’ हे मासिक निघू लागले. हे मासिक प्रामुख्याने शिक्षकांसाठी होते. अध्यापन पद्धती आणि अध्यापन यांतील अडचणींवर ‘पुणे पाठशालापत्रक’मधून लेखन प्रकाशित होई. हे मासिक दीर्घ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ShubhadaChaukar
5 वर्षांपूर्वीलेख अभ्यासपूर्ण आहे। बाल किशोर मासिकांच्या इतिहासाचा धांडोळा घेऊन लिहिलेला हा लेख महत्त्वाचा संदर्भलेख मगणून जतन करीन। शुभदा चौकर
Leena nikam
5 वर्षांपूर्वीSundar