fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

शब्दांच्या पाऊलखुणा – खुंटा धरला म्हणजे ओवी येते! (भाग आठ)

औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरण हातात हात घालून आले अन् मग आपलं राहणीमानही बदलत गेलं. आपले पोशाख, केशरचना यांच्या फॅशन्स बदलल्या तशी वास्तुरचनाही बदलली. घर बांधण्याच्या पद्धती, त्यातील फर्निचर बदललं. अन् मग आधीच्या वास्तुरचनेतील शब्दही मागे पडले. असाच एक शब्द म्हणजे खुंटी किंवा खुंटा.

पूर्वीच्या घरांमध्ये मग तो चौसोपी वाडा असो नाही तर साधं कौलारू घरं; सर्वच घरांमध्ये भिंतीला लाकडी खुंट्या असायच्या. या खुंट्या बहुउपयोगी असायच्या. कपडे, पिशव्या, शेतातील अवजारे, दोरखंड असं काहीही त्यावर सहज अडकवता यायचं. या लाकडी खुंट्या थेट भिंतीत असल्याने वजनाने भारी असलेल्या वस्तुही सहज पेलायच्या. भिंतीवरची ही लाकडी खुंटी जमिनीत पुरून त्याचा जनावरांना बांधण्यासाठी उपयोग केला की त्याचे पुल्लिंगी रूप होते खुंटा. या अर्थाने केळीचा बुंधा, लहान दांडा, खांब यांनाही खुंटा म्हटलं जातं. पूर्वी जात्यावर धान्य दळताना जात्याची वरची पाळी ओढावी लागत असे. त्या पाळीवर वित दीड वित  लांबीचा लाकडी  दांडा ठोकला जाई. त्यालाही खुंटाच म्हणतात.

‘खुंट’ शब्दाचे मूळ संस्कृतमधील ‘कुठ्’ किंवा ‘कुंठ’ या  शब्दात आहे. या संस्कृत शब्दाचा अर्थ थांबणे, अडविणे, प्रतिरोध करणे, विरोध करणेअसा आहे. खुंटवरून तयार झालेल्या ‘खुंटणे’ या क्रियापादावरूनही या अर्थाची प्रचिती येते. आजही जुन्या जाणत्या माणसांना एखाद्या चांगल्या कामासाठी घराबाहेर पडताना ‘कुठं चाललात/निघालात’ असं म्हटलेलं मुळीच खपत नाही, त्याचं कारणही हेच आहे. त्यांना त्या ‘कुठं’मध्ये

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 9 Comments

  1. अप्रतिम लेख!

  2. खुंटीच्या वेगवेगळ्या अर्थछटा व्यक्त अप्रतिम लेख!

  3. माहितीपूर्ण लेख.. 

  4. खूप छान, माहितीपूर्ण..

  5. खुंट या शब्दाचे वेगवेगळे अर्थ छान मांडले आहेत.

  6. खुंट शब्दाची व्युत्पत्ती ,त्याच्या आधारे विविध शब्द आणि अर्थ च्छटा खूप छान उलगडल्या आहेत.

  7. चांगली माहिती.

  8. उपयुक्त अभ्यासपूर्ण लेख !खुंट च्या मुळापासून विविध शब्द छटांचा अर्थ रंजक व कुतुहलतेने शब्द चित्रासह उभाराहतो.संदर्भासाठी छान!

  9. खुंट हा बोली भाषेत वारंवार वापरता जाणारा शब्द, शब्दाचा इतिहास, उत्तर दक्षिण व्याप्ती ,त्यापासुन प्रचलित म्हणी , वाक् प्रचार प्रस्तुत लेखात ज्या पद्धतिने गुंफन केली, स्तुत्य आहे.

Leave a Reply

Close Menu