fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

शब्दांच्या पाऊलखुणा – खलबत आणि खलबत्ता (भाग सात)

मराठी माणसाला मराठ्यांचा इतिहास आणि त्यातील गारद्यांनी केलेल्या नारायणराव पेशव्यांच्या खुनावरून मराठीत प्रचलित झालेली ‘ध चा मा करणे’ ही म्हण चांगलीच ठाऊक आहे. नारायणराव पेशव्यांचा हा खून एक कुटील डाव होता. मात्र शब्दांचे खून करण्याचे प्रकार समाजमाध्यमांवर सर्रास घडताना दिसतात. नोव्हेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडली, निकाल लागले, सकृत्दर्शनी काही विजयी झाले, तर काही हरले. सकृत्दर्शनी विजयी झालेल्यांचे सरकार होता होईना. मग सकृत्दर्शनी विजयी न झालेले सरकार स्थापन करायच्या तयारीला लागले. अन् या सगळ्यात सरकार स्थापन व्हायला अंमळ उशीर झाला. कारण आधी कधीच झाली नव्हती अशी महाआघाडी महाराष्ट्रात होऊ घातली होती. अन् मग एका प्रसिद्ध बातम्यांच्या वाहिनीवर ओळ झळकली ती अशी – ‘अमुक तमुक पक्षाच्या नेत्यांमध्ये सत्तास्थापनेसाठी खलबत्ते सुरू आहेत.’ आणि बातमी देणारा निवेदकही ‘खलबतं’ न म्हणता ‘खलबत्ते’ असा उच्चार करत होता. या बातमीत केला गेलेला ‘खलबतं’ऐवजी ‘खलबत्ते’ हा उच्चार आजच्या मराठीत अगदीच अस्थानी आणि अयोग्य असला तरी या निमित्ताने या दोन शब्दांचे मूळ शोधताना मिळालेली माहिती मोठी गमतीशीर आहे.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 3 Comments

  1. खूप छान आणि माहितीपूर्ण

  2. फारच छान

  3. छान!

Leave a Reply

Close Menu