fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

नवयुग वाचनमाला आणि भाषेचे संस्कार (भाग दोन)

मुलांची मराठी भाषा समृद्ध व्हावी म्हणून आचार्य अत्रे यांनी पूर्वप्राथमिक ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी १९३०च्या दशकात नवयुग वाचनमाला सुरू केली. अत्रे यांच्या बालसाहित्याचा आढावा घेणाऱ्या लेखमालेतील डॉ. वीणा सानेकर यांचा हा दुसरा  लेख.

—————————————————————————–

नवयुग वाचनमालेची आठवण झाली आणि अनपेक्षितपणे घरातल्या पुस्तकांमधली आचार्य अत्रे यांची आणखी दोन पुस्तके आठवली. कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले ही ती दोन पुस्तके. ‘कऱ्हेचे पाणी’ या अत्रे यांच्या आत्मकथनातील दुसऱ्या खंडात त्यांनी मुलांसाठी रचलेल्या गोष्टी नि पाठांमागची भूमिका स्पष्ट केली आहे. ती पुढीलप्रमाणे – “मुलांना भावी आायुष्यात उत्तम मराठी भाषा बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. आधुनिक वाङ्‍मयात जे जे विविध प्रकार नि तंत्रे आली होती, त्यांचा मोठ्या कौशल्याने मी या गोष्टींतून उपयोग करून घेतला आहे. लहान मुले ज्या भाषेत बोलतात, त्याच घरगुती भाषेचा मी सर्रास उपयोग करून घेतला आहे. प्रौढ माणसे बोलतात ती किंवा छापील पुस्तकांमध्ये जशी सापडते, तशी भाषा  मुलांना वाचायला लावणे हे मानसशास्त्राच्या विरुद्ध आहे”

आता बालवाङ्‍मयाकडून मुले प्लेग्रुप, केजी अशी क्रमाने इंग्रजी शाळांकडे वळू लागली. या लहान मुलांना मराठीची  गोडी कशी लावणार, हा प्रश्न आज सहज दुर्लक्षिला जातो. आपल्या भाषेची गोडी लावणाऱ्या सुंदर गमतीजमती ‘कावळ्यांची शाळा’ या पुस्तकातील गोष्टींमध्ये सापडतात. सशाच्या पाठीवर पान पडले आणि त्याला वाटले  की आभाळच आपल्या पाठीवर पडले आहे, ही गोष्ट आपणा सर्वांनाच  माहीत आहे. पानाचे सशाच्या पाठीवर पडणे आणि  सशाचे घाबरणे ही म्हटले तर एक छोटीशी  क्रिया आहे, पण त्यातले ‘सशाचे घाबरणे’ अत्र्यांनी कसे खुलवले आहे ते पाहा –

ससा  वारा सुटला की दचके.

ढग गरजला की दचके.

वीज चमकली की दचके.

झाड हलले की दचके.

पान पडले  की दचके.

इकडे बघे की दचके.

वर बघून दचके.

खाली  बघून दचके.

‘पळपुटी पुरी’ या गोष्टीत बनी, अनी आणि जनी यांच्या तावडीतून सुटून एक पुरी कशी धूम पळाली, ही कल्पना रंगवली आहे. पुढे काय

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. दोनही लेख छान ! खरं तर मुलांसाठी छोट्या छोट्या गोष्टीतून भाषेकडे नेंण्याचे, भाषेची गोडी निर्माण करण्याचे नवयुग वाचनमाला हे माध्यम आहे, इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी भाषेची आवड निर्माण करण्यासाठी अशा उदबोधनपर लहान गोष्टी, कविता यांची आवश्यकता आहे (वाचू आनंदे, पंचतंत्र, पारंपरिक लोककथा, बिरबल कथा,तेनाली राम, सिंहासन बत्तीशी, लघुकथा, बालकविता इत्यादी)

  2. अप्रतिम. मराठी भाषा समृद्ध आहेच. आणि या ,👆गोष्टी तर फारच छान आहेत.

Leave a Reply

Close Menu