भाषेचा सच्चा शिलेदार – अरुण फडके


मराठी लिहिता - वाचता येणाऱ्यांना, शिकणाऱ्यांना हमखास उपयोगी पडणारा ‘मराठी लेखन-कोश’, मराठी शब्दांच्या प्रमाण-लिखाणाबाबत जे शोधाल ते हा कोश देतो. सरसकट चुकीच्या पद्धतीने लिहिले जाणारे शब्दही अनामिकेच्या चिन्हाने दर्शवतो.  या कोशाचे संकल्पनाकार, रचनाकार, संपादक अरुण फडके यांचे १४ मे २०२० रोजी कर्करोगाने निधन झाले. मराठी लेखनकोश, मुद्रितशोधन, व्याकरण व प्रमाणभाषा लेखनाचा प्रसार अशा अनेक पातळ्यांवर त्यांनी केलेले काम हे हिमालयाएवढे आहे. त्याहूनही अनेक अफाट योजना, कल्पना मनात ठेवून सर अनंतात विलीन झाले. त्यांचा उत्साह, कामाचा झपाटा याच्याशी परिचित असणाऱ्या प्रत्येकालाच हा धक्का होता.

शुद्धलेखन या प्रकाराचा पूर्वी दबदबा असला तरी त्याबाबत मूलभूत आणि दिशादर्शक लिखाण फारसे झालेले नाही. आता तर शुद्धलेखन हा थोडा वादाचा विषय होतो. हा वादही कोणते नियम योग्य - अयोग्य याबद्दल नसून नियमांची गरजच काय या भूमिकेतून घातला जातो. या वादात सर फारसे पडले नाहीत. ‘भाषा प्रवाही आहे असे म्हणत तिला वाटेल तसे वापरण्याने गोंधळच होणार', ही त्यांची भूमिका. शब्द लिखाणाच्या रुढ पद्धतींना नियम लावणे, अपवाद शोधून प्रमाणलेखन सिद्ध करणे, काही नियमांच्या स्पष्टतेवर प्रश्न उभे करणे त्यावर वेगवेगळ्या माध्यमांतून उत्तरे शोधणे आणि पुरविणे यालाच त्यांनी वाहून घेतले.  केवळ वीस पंचवीस वर्षांत त्यांनी एकाहाती जे काम उभे केले आहे ते पाहूनच जीव दडपून जातो. आणि ते सुद्धा स्वतःचा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1.   4 वर्षांपूर्वी

    फडके सरांची पुस्तके मॅजेस्टिक जवाहर जत्रेत. खरेदी केलीत.मुलांसाठी उपयुक्त ठरलीत.श्रवण संभाषणातून उलगडणार्या भाषा कौशल्यावर प्रेम करणारा मराठीचा सच्चा शिलेदार आपल्यात नसण्याची खंत मोठी आहे.

  2. साधना गोरे

      4 वर्षांपूर्वी

    आनंद, फडके सरांची सर्व पुस्तके ठाण्यातील मॅजेस्टिक बुक डेपोमध्ये आपल्याला उपलब्ध होतील. शिवाय बुकगंगावरून ऑनलाईनही मागवता येतील.

  3. Anand G Mayekar

      4 वर्षांपूर्वी

    Anand G Mayekar18 MAY 2020 REPLY Marathi bhashechya jatanasathi, bhasha jopasanyasathi ani bhasha shastra shuddha vhavi yasathi jyani amol yogdan dile asha, Phadke sir, ek yogi-arka yana hrudayapasun dandwat ani bhavpurn adaranjali. Adhyayan kartine Adhyapan kartyala vahileli hi shabda-kusunanjali adaraniya ahe. Varil namud kelelya pustaka baddal …Tyanchya upalabdharevar krupaya mahiti dyavi. Ha anmol theva apalya bhandarat asava ani tyacha yogya aswad ghyava hi ichha. Ek Thanekar, ek vachak ani Marathi bhashecha upasak ya natyane mi prarthana karato ki Phadke siranchya he mahan karyachi jyoti akhand tevat raho

  4. patankarsushama

      4 वर्षांपूर्वी

    भावपूर्ण श्रद्धांजली

  5. kaustubhtamhankar

      4 वर्षांपूर्वी

    श्री अरुण फडके यांचा माझा परिचय खूप जुना.माझ्या शून्यकचरा या पुस्तकाचे मुद्रितशोधन त्यांनी केले. खरतर पुस्तक प्रकाशनाचे तंत्रच त्यांच्यामुळे मला समजले. त्यांच्या जाण्याने भाषा पोरकी झाली आहे. श्रद्धांजली वाहतांना माझ्याबरोबरच माझ्या अक्षरांचे डोळेही पाणावत आहेत.

  6. vilasrose

      4 वर्षांपूर्वी

    भावपूर्ण श्रद्धांजली!

  7. संजय रत्नपारखी

      4 वर्षांपूर्वी

    मराठी भाषेसाठी अरुण फडके यांनी मोठे योगदान दिले आहे. नव्वदच्या दशकात इंग्रजी भाषा संगणक , ई-मेल मधून अधिक विस्तारत असताना, फडके यांनी मराठी शुद्ध लेखन ध्वज खांद्यावर घेऊन कार्यशाळा घेतल्या. मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात पुस्तके संपादित करताना, त्यांच्या पुस्तकाचा आधार अनेकवेळा घेतला होता. आपल्याला आपली भाषा शास्त्रशुद्ध वापरता आली पाहिजे, हे काम फडके यांनी व्याकरणावर पुस्तके लिहून सुलभ केले होते. भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐

  8. Anand G Mayekar

      4 वर्षांपूर्वी

    Marathi bhashechya jatanasathi, bhasha jopasanyasathi ani bhasha shastra shuddha vhavi yasathi jyani amol yogdan dile asha, Phadke sir, ek yogi-arka yana hrudayapasun dandwat ani bhavpurn adaranjali. Adhyayan kartine Adhyapan kartyala vahileli hi shabda-kusunanjali adaraniya ahe. Varil namud kelelya pustaka baddal ...Tyanchya upalabdharevar krupaya mahiti dyavi. Ha anmol theva apalya bhandarat asava ani tyacha yogya aswad ghyava hi ichha. Ek Thanekar, ek vachak ani Marathi bhashecha upasak ya natyane mi prarthana karato ki Phadke siranchya he mahan karyachi jyoti akhand tevat raho



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen