काय आहे ‘मराठा’ शब्दाचा इतिहास?

महान राष्ट्र ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील रहिवाशी ते मराठा – मराठी, साधारण अशीच काहीशी व्युत्पत्ती आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. जॉन विल्सन यांनी मोल्सवर्थच्या कोशात महाराष्ट्र म्हणजे ‘महार+राष्ट्र म्हणजे महारांचे राष्ट्र’ अशी एक लोकवाचक व्युत्पत्ती सुचवली आहे आणि ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीही तिचा पुरस्कार केला आहे. महामहोपाध्याय पां. वा. काणे यांच्या मते “महान राष्ट्र’ यावरून महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती झाली असून हे नाव कोणत्याही वंशावरून किंवा जातीवरून पडलेले नसून, ते देशाच्या विस्तारावरून पडले असावे. राजारामशास्त्री भागवत यांनी “मऱ्हाटा’ म्हणजे “मरता तव हटता’ (मरतो तेव्हा हटतो) अशी व्युत्पत्ती सांगितली आहे, तर ‘महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र म्हणोन महाराष्ट्र’ असा उल्लेख महानुभावी ग्रंथकारांच्या “आचारमहाभाष्या’तही मिळतो. मात्र याहून अगदी वेगळी व्युत्पत्ती इतिहासाचार्य वि. का. राजवाडे  यांनी सांगितली आहे. ‘मराठा’ शब्दाचा संबंध महाराष्ट्रातील वऱ्हाड व कऱ्हाड या प्रांताशी जोडू पाहणारा राजवाडे यांचा हा लेख. राजवाड्यांनी या लेखाच्या शेवटी केलीली विधानेही चिंतनीय आहेत.

——————————————————————————————–

‘मराठा’ शब्द ‘महाराष्ट्र’ शब्दाचा अपभ्रंश कित्येक समजतात. कित्येक ‘महारट्ट’ शब्दाचा अपभ्रंश असावा असे म्हणतात. आणि कित्येक ‘महरट्ट’ असें या शब्दाचे मूळ स्वरूप असावे असे प्रतिपादितात. पैकी दुसरी व्युत्पत्ती विद्वानांना मान्य आहे असे दिसते. डॉ. भांडारकरांनी आपल्या दक्खनच्या इतिहासात हीच व्युत्पत्ती मानिली आहे. शकांच्या,  शातवाहनांच्या व अशोकाच्या वेळी दक्षिणेत ‘रट्ट’ म्हणून एक लोक होते;  त्यांचेच भाऊबंद ‘रड्ड,  रड्डी’ वगैरे उत्तर कर्नाटकांतील काही जुने लोक होत;  ह्या रट्टांपैकी कित्येक कुळी महा पराक्रमी निघाल्या व त्यांनी आपल्याला महारट्ट असें बहुमानार्थी नाव घेतले;  वगैरे अनुमानें काढलेली प्रसिद्ध आहेत. कार्ले येथील शिलालेखांत ‘महारथी’ व ‘महारथिनी’ असे शब्द आलेले आहेत. ते दोन हजार वर्षांपूर्वीच्या मराठ्यांचे वाचक आहेत असे बहुतेक सर्व प्राचीन लेखशोधकांचे म्हणणे आहे; परंतु ‘महारथी’ ह्या संस्कृत शब्दाचे ‘महारट्ट’ असे प्राकृत रूप कसे झाले हे नीट उलगडून कोणीच दाखविले नाही.

हेही वाचाः –

शब्दांच्या पाऊलखुणा – सेनापती शत्रूला जाऊन मिळाला! (भाग – दहा)

शब्दांच्या पाऊलखुणा – पैसे भेटले? (भाग – नऊ

‘रथ’ शब्दाचे रह व ‘रथी’ शब्दाचे रही अशी प्राकृत रूपे होतात; रट्ट व रट्टी अशी होत नाहीत. महारथी उगाच मजेखातर रूप लिहिले, असेहि म्हणणे शोभत नाही. कारण, हे शिलालेख काही कोणाला फसविण्याकरिता लिहिलेले नाहीत. त्या वेळी जे रूप प्रचलित असेल तेच लिहिले असेल. अशोकाच्या शिलालेखात ‘रास्टिक’

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply